नांदगाव येथे एका शेतात वाघाचे मृतदेह संशयास्पद स्थितीत मिळाल्याने वन विभागात खळबळ

0
141

चंद्रपूर :  (मोहम्मद सुलेमान बेग)
पोंभूर्णा वन परिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या नांदगाव येथे एका शेतात पूर्ण वाढ झालेला वाघाचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आज दि. 6 फरवरी 2023 रोजी सकाळी 11.00 वाजताच्या सुमारास उघडकीस आली.
सदर घटना ही पुनाजी नागमकार यांच्या शेतातील असून वाघाचे मृत्यूचे नेमके कारण काय हे अद्याप वन विभागाने जाहीर केलेले नाही. जिवंत विद्युत प्रवाहाच्या स्पर्शाने वाघाचा मृत्यू झाले असल्याचे अंदाज व्यक्त केले जात आहेत. तसेच वाघाचा मृतदेह तणसाच्या खाली लपवून ठेवण्यात आले असल्याचे समोर येत आहे.
सदर घटनास्थळी वनपरिक्षेत्र अधिकारी फनींद्र गादेवार यांच्या समक्ष मौका पंचनामा करण्यात आला व तसेच ग्रामस्थांना याची माहिती मिळताच गर्दी जमा होऊ लागली होती.
जिवंत विद्युत प्रवाहाच्या स्पर्शाने वन्य प्राण्यांचे मृत्यूची संख्या जिल्ह्यात वाढत असल्याचे समोर येत आहे. तेव्हा संबंधित अधिकाऱ्याने सखोल चौकशी करून आरोपीवर योग्य कारवाही करावी असे परिसरातील वन्यजीव प्रेमीची हाक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here