ताडोबा वनपरिक्षेत्रात पार्टी करणे पडले महागात

0
178

चंद्रपूर : (मोहम्मद सुलेमान बेग)  जगप्रसिद्ध ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील मोहर्ली पद्मापुर मार्गाने जात असतांना दोन चारचाकी गाडी ताडोबा बफर सफारीच्या रस्त्या खाली उतरून मोठ्याने गाने लावून पार्टी करत असल्याचे तेथिल स्थानिक गाईड व ड्राइवरच्या लक्षात येताच त्यांनी मोहर्ली वनपरिक्षेत्र  कार्यालयास माहिती दिली. माहिती मिळताच वन विभागाची टीम घटना स्थळी दाखल  झाली.
ज्या परिसरात भर दिवसा बाघ रस्त्याने चालताना दिसतो.
अशा या संवेदनशील परिसरात गाडी खाली उतरून गाने लावून पार्टी करने म्हणजे “आ बैल मुझे मार जैसा है”
सदर घटनेत वनपरिक्षेत्र अधिकारी मोहर्ली (बफर) संतोष थिपे,  यांनी अन्य राज्यातून आलेल्या वाहन चालकांकडून ५००० रु. दंड घेतला  व त्यांना लगेच जंगला बाहेर काढण्यात आला.

 सदर प्रकरणात राजवेंद्र दुबे(उत्तर प्रदेश ), किरण इंगोले(पुणे),अनंत (तामिळनाडू ),संतू राऊत(मिर्झापूर ), राकेश राठी (हरियाणा ), रविकुमार (बिहार ), मोरेश्वर मराठे (झारखंड ),संघरत्न जिवतोडे (नांदेड-महाराष्ट्र ), आदित्य मिश्रा (दिल्ली ), डॅनिअल प्रभाकरण (तामिळनाडू ) यांच्या कडून दंड आकारून त्यांना जंगलाबाहेर काढण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here