विशेष व्याघ्र संरक्षण दलातील वनरक्षकांना हवी बदली, मागील 8 वर्षापासून एकाच शाखेमध्ये कार्यरत

0
430

चंद्रपूर/ प्रतिनिधी

महाराष्ट्र वनसेवेमधील अधिकारी व कर्मचारी यांच्या बदल्या विषयक धोरणानुसार बदली विषयक कायदा 2006 बदली विषयक कायद्यात नमूद – ब 2) नुसार वनविभागाच्या वन्यजीव शाखेमध्ये एक पदावधी पूर्ण केल्यावर प्रादेशिक वनविभागात बदली करण्यात यावी असे स्पष्ट नमूद आहे. मात्र, ताडोबातील वनरक्षक सेवा मागील 8 वर्षापासून एकाच शाखेमध्ये आहे. मागील वर्षी बदली सत्रात आमच्यावर झालेल्या अन्यायाला न्याय देऊन येत्या बदली सत्रात ( 2021-22 ) विशेष व्याघ्र संरक्षण दलातील वनरक्षकांना प्रथम प्राधान्य देऊन प्रादेशिक वनविभागात बदली देण्यात यावी, अशी मागणी विशेष व्याघ्र संरक्षण दलातील सर्व वनरक्षकांनी केली आहे.

मा. उपवनसंरक्षक चंद्रपूर वनविभाग चंद्रपूर यांचे कार्यालयीन पत्र क्र.कक्ष 6/आस्था/ प्रक्र. /12-13/ 1603 चंद्रपूर दिनांक 11/12/2012 नुसार वनरक्षकाची नियुक्ती वनविभागातील (गट क )संवर्गातील वनरक्षक पदावर नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर मा.मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्रसंचालक ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर यांचे कार्यालयीन पत्र क्र. कक्ष -2 /आस्था /12-13 /28 चंद्रपूर दिनांक 05/01/2013 नुसार पदस्थापना व्याघ्र संरक्षण दल -3 पांगडी येथे करण्यात आली. दिनांक 05/01/2013 ते आजतायगत ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात कार्यरत असलेल्या विशेष व्याघ्र संरक्षण दलात वनरक्षक या पदावर कार्यरत आहेत.
पेंच व्याघ्र प्रकल्प नागपूर येथील विशेष व्याघ्र संरक्षण दलात कार्यरत वनरक्षक यांनी प्रादेशिक वनविभागात बदली करण्याबाबत मूळ अर्ज क्र. 610,939 /2017 मा. महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण नागपूर यांच्या कडे दाखल केला होता. त्यावर मा.महाराष्ट् प्रशासकीय न्यायाधिकरण नागपूर यांनी दिनांक 02/08/2017 व 30/04/2019 च्या विनंती अर्जावर तीन महीन्याच्या आत निर्णय घेण्यास मा.प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख ) महाराष्ट्र राज्य नागपूर यांना आदेशित केले होते. त्यानुसार मा.प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख ) महाराष्ट्र राज्य नागपूर यांनी 18/10/2019 त्यांच्या कार्यालयीन आदेशान्वये मा.अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव ) पूर्व नागपूर यांनी मा.वनसंरक्षक तथा क्षेत्रसंचालक ताडोबा अंधारी , पेंच , मेळघाट , नवेगाव – नागझिरा तसेच मा. मुख्य वनसंरक्षक सर्व यांना आदेशित केले होते की , ज्या विशेष व्याघ्र दलात कार्यरत असणाऱ्या वनरक्षकांस 6 वर्षे किंवा दोन पदावधी पूर्ण झाले आहेत अशा वनरक्षकांची सेवाज्येष्ठतेनुसार प्रादेशिक वनविभागात बदली करण्यात यावी, मात्र, तसे झाले नाही.
मा. प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख ) महाराष्ट्र राज्य नागपूर यांचे दिनांक 18/10/2019 च्या सरंजामी आदेशाच्या अधिन राहून मा.मुख्य वनसंरक्षक नागपूर वनवृत्त नागपूर यांनी मा.उपवनसंरक्षक नागपूर यांना आदेशित केल्यानुसार त्यांनी सामान्य प्रशासन विभाग महाराष्ट्र राज्य यांनी काढलेल्या शासन निर्णय सन 2020-21 या अर्थीक वर्षातील बदल्यासंदर्भात करावयांच्या कार्यवाही बाबतच्या सुचनेच्या अधिन राहून विशेष व्याघ्र संरक्षण दल पेंच नागपूर येथे सन- 2012-13 पासून कार्यरत असणाऱ्या सर्व वनरक्षकांची सेवाज्येष्ठतेनुसार बदली प्रादेशिक वनविभागात केलेली आहे.
सदर संदर्भातील स्थायी आदेशानुसार विशेष व्याघ्र संरक्षण दल ताडोबा येथे सन 2012-13 पासून कार्यरत असणाऱ्या सर्व वनरक्षकांची बदली होने क्रमप्राप्त असून सुद्धा मा.मुख्य वनसंरक्षक चंद्रपूर वनवृत्त, चंद्रपूर व मा. वनसंरक्षक तथा क्षेत्रसंचालक ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर यांनी वरीष्ठांच्या आदेशाला नजूमानता बदली सन 2020 मध्ये विशेष व्याघ्र संरक्षण दलात कार्यरत असणाऱ्या 78 वनरक्षकांपैकी फक्त 13 वनरक्षकांचीच बदली केली. सदर बदली प्रक्रियेत बदली अधिनियमानुसार पात्र असून सुद्धा उर्वरित वनरक्षकांची बदली केलेली नाही.
मा. महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण नागपूर, मा.प्रधान मुख्य वनसंरक्षक वनबल प्रमुख महाराष्ट्र राज्य नागपूर यांनी वेळोवेळी आदेशीत करुन सुध्दा विशेष व्याघ्र संरक्षण दल ताडोबातील कार्यरत वनरक्षकांची बदली बदली सत्र 2020 मध्ये केली नाही. सदर बदली प्रक्रिया ही नियमाला डावलून करत असल्यामुळे आम्ही सर्व वनरक्षक यांनी मुख्य वनसंरक्षक चंद्रपूर वनवृत्त चंद्रपूर व मा.वनसंरक्षक तथा क्षेत्रसंचालक ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर, यांचेकडे बदलीवर आक्षेप नोंदविला असता त्यांचे कार्यालयाकडून कोणत्याही प्रकारची माहिती मिळाली नाही. मागील वर्षी बदली सत्रात आमच्यावर झालेल्या अन्यायाला न्याय देऊन येत्या बदली सत्रात ( 2021-22 ) विशेष व्याघ्र संरक्षण दलातील वनरक्षकांना प्रथम प्राधान्य देऊन प्रादेशिक वनविभागात बदली देण्यात यावी, अशी मागणी विशेष व्याघ्र संरक्षण दलातील सर्व वनरक्षकांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here