चंद्रपूर, :
बहुप्रतिक्षित आणि राज्य वन्यजीव सल्लागार मंडळ च्या बैठकीत मंजुरी प्राप्त झाल्यानंतर, आज चंद्रपूर जिल्ह्यातील अत्यंत महत्वाचे व राज्यातील “पन्नासावे वन्यजीव अभयारण्य” ठरलेले “कन्हारगाव वन्यजीव अभयारण्य” ची अधिसूचना राज्य शासनाने काढून वन्यजीव संवर्धनात एक मैलाचा दगड गाठलेला आहे.
कन्हारगाव अभयारण्य’ ताडोबा ते तेलगांना पुढे छत्तीसगड मधील इंद्रावती व्याघ्र प्रकल्प पर्यंत थेट जोडला जाणारा ‘व्याघ्र भ्रमनमार्ग’ मधील अत्यंत महत्वाचा जागी असलेले कन्हारगाव वनक्षेत्रास अभयारण्याचा दर्जा मिळाल्याने वन-वन्यजीव संवर्धन सोबत सभोवतालच्या परिसरातील गावाच्या विकासाचा सुद्धा मार्ग खुला होईल.