सावर्ला गावात बिबट्याच्या हल्ला

0
563

तळोधी बा. :-
तळोधी वनपरिक्षेत्र अंतर्गत सावरला या गावातील श्री बबन सडमाके यांच्या गुरांच्या गोठयात प्रवेश करून बिबट्याने वासराला जखमी केल्याची घटना सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास घडली.
सावर्ला हे गाव गायमुख जंगलाला लागून आहे. या गावात व शेजारी नेहमीच बिबट् तथा पट्टेदार वाघाची दहशत असते. या परिसरातील अनेक पाळीव प्राण्यांची वाघ/ बिबट्याने शिकार केली आहे. तसेच या गावातील मजूर लोक तळोधी येथे कामासाठी जात असतात आणि ते रात्री 8 ते 9 वाजेपर्यंत जंगलालगत च्या रस्त्यानेच घरी परतात. या गावात सतत बिबट्याच्या हल्ल्यात पाळीव प्राण्यांची शिकार केली जाते. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
वन विभागाने या परिसरात सोलर लाईट ची व्यवस्था केली आहे. मात्र या बिटाचे वनरक्षका कडे आलेवाही बिटाचे सुध्दा काम आहे. असे दोन दोन प्रभार असल्याने त्यांना या अतिरिक्त कार्यभार मुळे स्वतः च्या बिट परिसरात सतत वन्यजीव हमले होत असताना सुध्दा, त्याबद्दल नियंत्रण, दक्षता घ्यायला त्या संवेदनशील असलेल्या भागात जाऊन शेळ्या, मेंढ्या, कोंबडी, कुत्रेही यांच्यावर होणार्या बिबट्या च्या हमल्या संदर्भात नियोजन करायला कवळी मात्र ही फुरसत ऊरलेली नाही. वनरक्षकहे मानसीक दळपनात,व वरिष्ठांच्या दबावामुळे दोन्ही बिट सांभाळत आहेत. यात तळोधी वनपरिक्षेत्रातील वनरक्षकांंची मोठी दमशाक होते आहे. मात्र या प्रकारच्या घटना वारंवार घडत आहेत, व यात कोनती मानव हानी होन्याची शक्यता नाकारता येणार नाही. असे घडल्यास याला वरिष्ठ अधिकारी हेच जिम्मेदार असतील.
गावात येऊन शिकार करणार्या हिंस्र वन्यप्राण्यांचा लवकरात- लवकर बंदोबस्त करावा अशी मागणी सावर्ला येथिल पो.पाटिल, सौ.अपुर्वा मेश्राम, व नागरिकाकडून केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here