ताडोबा डायरी मासिकचे मोहर्ली येथे प्रकाशन

0
1873


“ताडोबा डायरी” या वैशिष्ट्यपूर्ण मासिकाचे प्रकाशन दिनांक 5 डिसेंबर 2021 रोजी मोहर्ली येथील ताडोबा फाउंडेशन ऑफिस येथे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सुनील लिमये यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी PCCF सुनील लिमये यांनी म्हटले की ताडोबा डायरी मासिका प्रमाणे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात सुध्दा मासिक प्रकाशित करू.

यावेळेस डॉ. जितेंद्र रामगावकर, क्षेत्र संचालक ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, बापूजी येडे सहाय्यक वनसंरक्षक, ताडोबा डायरी कार्यकारी संपादक अनंत सोनवणे , मोहर्ली (कोअर) वनसंरक्षक गोंध, मोहर्ली (बफ़र) वनसंरक्षक आर. जी. मून, वन्यजीव संरक्षक प्रेरणा सिंग बिंद्रा , ताडोबा जंगल कॅम्पचे महाव्यवस्थापक हिमांशू बागडे , वन्यजीव जीवशास्त्रज्ञ प्राजक्ता हुशंगाबादकर , क्षेत्र सहाय्यक आकाश मल्लेलवार, विलास कोसनकर, गजापूरे, वनरक्षक देशमुख, पवन मंडुलवार, पवार, सुलेमान बेग वनसमाचार पोर्टल संपादक, नाईट सफारी गाईड आदि प्रामुख्याने उपस्थित होते.
डॉ. जितेंद्र रामगावकर यांनी संचालन व प्रास्ताविक भाषणात ते म्हणाले ताडोबा डायरीचा हा पहिला अंक असून सध्या 10 पेजेज मध्ये प्रकाशित करण्यात येत आहे भविष्यात आणखी पेजेज वाढ़विण्यात येईल. ताडोबा डायरीची कीमत फक्त 20 रु आहे. वार्षिक सबस्क्रिप्शन फी-रु.200/- आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here