
- चंद्रपूर (मोहम्मद सुलेमान बेग):
जग प्रसिद्ध ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये मागील 2010 पासून कार्यरत असलेली जिप्सी इको टुरिझम वेल्फेअर सोसायटी, सतत वनविभागाला सहकार्य करणारे ही समिती दर वर्षी वन्यजीव सप्ताह निमित्त वनविभागा सोबत मोहर्ली ते मुधोली तसेच खुटवंडा ते मुधोली गावापर्यंत जिप्सी रॅली काढून साजरी करतात. तसेच यावर्षी मोहर्ली गावाच्या विकासाकरिता एक मदतीचा हात म्हणून वन्यजीव सप्ताह निमित्त मोहर्ली ग्राम विकासाकरिता डॉ. जितेंद्र रामगावकर कार्यकारी संचालक ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, उपसंचालक ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प काळे, उपसंचालक ताडोबा अंधेरी व्याघ्र प्रकल्प बफर कुशाग्र पाठक, वनपरिक्षेत्र अधिकारी मोहर्ली बफर संतोष थिपे यांच्या हस्ते जिप्सी इको टरिझम वेल्फेअर सोसायटी मोहर्ली यांच्या कडून गाव विकासाकरीता 1.95000 हजार रुपयांची देणगी गावाच्या विकासासाठी मदत स्वरूपात देण्यात आली.
यावेळेस जिप्सी इको टरिझम सोसायटीचे अध्यक्ष संजय मानकर, समीर शेख, अनील तिवाडे, शालीक जोगवे, बंडू वेखंडे व ग्राम परिस्थितीकीय विकास समिती मोहर्ली (EDC) अध्यक्ष संजय मोंढे, मोहर्ली बफर क्षेत्रसहाय्यक एस. जुमडे आदी उपस्थित होते.
तसेच डॉ. जितेंद्र रामगावकर कार्यकारी संचालक ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प यांनी ग्राम विकासाकरिता लागणारी निधी पुढे वनविभाग तर्फे उपलब्ध करू असे त्यांनी म्हटले.
