स्वाब नेचर केअर’ संस्था, पोलीस विभाग व वन विभागाच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन

0
195

चंद्रपूर :
‘स्वाब नेचर केअर’ संस्था, पोलीस विभाग व वन विभागाच्या संयुक्त विद्यमाने वन्यजीव सप्ताह निमित्य सावरगाव येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले व यावेळेस परिसरातील 37 रक्तदात्यांनी रक्तदान केले.
सावरगाव- तळोधी परिसरातील बहुतेक रुग्ण हे ब्रह्मपुरीच्या दवाखान्यामध्ये जात असतात, व तिथे रुग्णांना रक्तांची सतत आवश्यकता असल्याचे स्वाब नेचर केअर’ संस्थाच्या लक्षात येताच ब्रह्मपुरी येथील जिवन ज्योती रक्तपेढीला रक्त पुरविण्यात आले.
पर्यावरण संरक्षणासाठी ‘प्लास्टिक मुक्त पर्यावरण अभियान’ शाळा कॉलेजमध्ये ‘पर्यावरण साप व वाघ’ बद्दलचे मार्गदर्शन, शिबिर,  जंगला लगतच्या गावात आरोग्य शिबिर, व रक्तदान शिबिरांचे आयोजन ही स्वाब संस्था मागील सात-आठ वर्षापासून करत आहे व तसेच शासकीय यंत्रणा पोलीस विभाग व वनविभागाला देखील सतत सहकार्य करत असतात. स्वाब संस्थेच्या रक्तदान शिबिरात दोन्ही विभागाने सहकार्य केले.
या शिबिरांद्वारे सतत गडचिरोली, चंद्रपूरच्या शासकीय रुग्णालया करीता या मोठ्या प्रमाणात रक्त पुरवठा करण्यात येतो.मात्र शिबिरात रक्त दिलेल्या प्रत्येक रक्तदात्याला व त्याच्या परिवारातील किंवा मित्र परिवारातील कोणालाही व इतर गरजू व्यक्तींना आवश्यकता पडल्यास संस्था द्वारे केव्हाही एका फोनच्या कॉलवर  मोफत तात्काळ रक्त पोचविला जातो.


सदर रक्तदान शिबीर मध्ये केलेल्या 37 रक्त दात्यांमध्ये कविता कायरकर या महिलेने सुद्धा रक्तदान केले.
यावेळेस स्वाब संस्थेच्या उपस्थित सदस्यांनी सुभाष गजबे,भारत चुनारकर या पत्रकारांनी व इतर मित्र परिवारांनी रक्तदान केले. या वेळी जिवन ज्योती रक्तपेढी द्वारे डॉ. अनिल नामपल्लीवार, सुप्रिया,मयुरी, लोकेश, दिनेश यांनी रक्तगट तपासणी, रक्त संकलन केले.
शिबिराचे उद्घाटक म्हणून तळोधी (बा.) चे ठाणेदार मंगेश भोयर व उत्तम जी मुंगमोडे, प्राध्यापक अहेरी हे होते. रक्तदात्यांना यावेळेस प्रमाणपत्र टिफिन बॉक्स व प्रोटीन केळी चहा व नाश्ता देण्यात आला.
सदर कार्यक्रमास यशस्वी करण्याकरिता स्वाब संस्थेचे संपूर्ण सदस्यांनी मदत केली व आपली उपस्थिती दर्शविली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here