चंद्रपूर जिल्ह्यात हत्तीचा कळपाचा शिरकाव

0
2878

ओडीसा राज्यातून छत्तीसगड मार्गे हत्तीचा एक मोठा कड़प राजनांदगाव जिल्ह्यातून गडचिरोली – चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात दाखल झाला आहे. त्यात लहान-मोठे मिळून १८ ते २३ हत्ती असल्याचा अंदाज वन विभागाने वर्तविला आहे.

. दोन दिवसापूर्वी हत्तीचा कळप देसाईगंज (वडसा) तालुक्यातील उसेगाव कोंडाळा परिसरात आढळून आला होता त्यानंतर हा हत्तींचा कळप लागूनच असलेल्या चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याची सीमा निश्चित करणाऱ्या वैनगंगा नदी पात्र करीत ब्रह्मपुरी तालुक्यातील पिंपळगाव खरकाडा निलज शेत शिवारात दि .8 डिसेंबर 2021 रोजी रात्री 9 वाजताच्या सुमारास दाखल झाले आहे. हत्तीला बघण्यासाठी आसपासच्या गावातील लोकांची गर्दी होत आहे. सध्या जंगल शेजारी शेती मध्ये धान पिक
कापणी शुरू आहे आणि धान पिक हे हत्तीच आवडतं खाद्य आहे. त्यामुळे हत्ती शेतावर जाऊन धनाच नुकसान करू शकतात त्यांच्या जवळ गेले तर ग्रामस्थावर हल्ला करु शकतो. तसेच उपवनसंरक्षक गडचिरोली यांनी जिल्हा प्रशासनाला याबाबत सूचना केल्या आहेत. तसेच जवळील गावात दवंडी देऊन तसाच त्यांच्या सभा घेण्यात येत आहे व हत्ती पासून सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात येत आहे.
वन कर्मचाऱ्यांकडून हत्तींच्या हालचालीकडे लक्ष दिले जात आहे ब्रह्मपुरी वन विभागातील अधिकारी वन कर्मचारी सतत गस्त करीत आहेत. पिंपळगाव खरकडा निलज परिसरात हत्तींचा शिरकाव झाल्याने नागरिकांमध्ये भिंती निर्माण झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here