वाघाच्या नावावर मृत्यूचे प्रमाणीकरण नाही

0
359

विदर्भातील वाघांचे हल्ल्याचे प्रमाण सगळीकडे खूप वाढलेले दिसते आपण नेहमी ऐकतो की वाघाच्या हल्ल्यात शेतमजुराचा मृत्यू तर कधी शेतात कामावर जाताना मृत्यू असे अनेक प्रकरण आपल्या समोर येत आहेत पण एखादी घटना घडते आणि त्याची चौकशी तिथेच बंद होते मरणारा व्यक्ती वाघाचा हल्ल्यातच मेला की नाही याची चौकशी करणे फार गरजेचे आहे. तो वेगळ्या कारणांनी देखील मारला जाऊ शकतो हे वैज्ञानिक पातळीवर सिद्ध करू शकत नाही आणि मग वाघाला नरभक्षी ठरवून त्याला ठार करण्यास भाग पडतात.  मरणारा व्यक्ती नेमका कोणत्या कारणाने मेला हे सिद्ध करणे गरजेचे आहे अशी विनंती करणारी याचिका उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात वन्यजीव प्रेमी संगीता डोंगरा यांनी दाखल केली आहे या याचिकेवर दिनांक 9 एप्रिल शुक्रवारी न्यायाधीश सुनील शुक्रे आणि न्यायाधीश अविनाश घारोटे यांचा समक्ष सुनवाई झाली न्यायालयाने या विषयाला महत्त्व देऊन याचिकाकरत्याना मदत करण्यासाठी अँ. जिशान हक यांना न्यायालयीन मित्र म्हणून नियुक्त केले.
वाघाच्या हल्ल्यात मनुष्य ठार झाल्याचा नंतर त्या वाघाला पकडून प्राणिसंग्रहालयात पाठविले जाते किंवा त्याला ठार मारले जाते. याचे उदहारण अवनी प्रकरण आपल्या डोळ्यासमोर आहेत. यामुळे वन्यजीव व मानव संघर्ष कमी होऊ शकत नाही विदर्भातील जंगलात झालेले मृत्यू अनेक संशयास्पद आहेत.

अशा वेळेस वाघाचा हल्ल्यात नेमकी किती लोकं ठार होतात हे स्पष्ट करण्यासाठी याचिकाकर्त्यांनी मागणी केली आहेत.
या पुढची कोर्टाची तारीख 22 एप्रिल देण्यात आली आहे. पुढे काय होणार याकडे वन्यजीव प्रेमीचे लक्ष लागले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here