जंगलात तेंदूपत्ता संकलन करताना सावधगिरी बाळगा – विशाल सालकर

0
56

(सिंदेवाही वनविभागाने दिला सतर्कतेचा इशारा)

जिल्हा प्रतिनिधि (यश कायरकर) :

ग्रामीण भागातील मजुरांना दरवर्षी उन्हाळ्यात तेंदूपत्ता संकलनामुळे रोजगाराची संधी मिळत असते. मात्र, तेंदूपत्ता संकलनासाठी शेत व जंगल परिसरात जावे लागते, ज्यामुळे काहीवेळा वन्यप्राण्यांशी संघर्षाची शक्यता निर्माण होते. त्यामुळे तेंदूपत्ता संकलन करताना योग्य ती सावधगिरी बाळगण्याचे आवाहन सिंदेवाही वनविभागाकडून करण्यात आले आहे.

सद्यस्थितीत सिंदेवाही तालुक्यात तेंदूपत्ता संकलनाचे काम सुरू असून, संकलन करणाऱ्या मजुरांना खालील सूचना देण्यात आल्या आहेत :

  • वाघ, बिबट्या, अस्वल यांसारख्या हिंस्र
  • वन्यप्राण्यांपासून सावधगिरी बाळगा
    तेंदूची झाडे तोडू नयेत
  • पहाटेच्या अंधारात तेंदूपत्ता संकलनासाठी जाऊ नये
  • एकट्याने दाट जंगलात प्रवेश करू नये
  • एखादा हिंस्र प्राणी दिसल्यास त्वरित वनविभागाला माहिती द्यावी
  • तेंदूच्या कोवळ्या पानांची तोड टाळावी

संपर्कासाठी वनविभागाचा टोल-फ्री क्रमांक: 18003033 उपलब्ध आहे.
सर्व मजुरांनी आणि गावकऱ्यांनी वनविभागाच्या सूचनांचे पालन करून आपली व इतरांची सुरक्षितता जपावी, असे आवाहन वन विभागाचे विशाल सालकर (वनपरिक्षेत्र अधिकारी, सिंदेवाही) यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here