गावालगत रानकुत्र्यांनी केली चितळाची शिकार

0
154

तळोधी (बा.)

तळोधी बाळापुर वनपरिक्षेत्र अंतर्गत गंगासागर (हेटी) बिटातील गंगासागर हेटी या गावालगत मध्ये रान कुत्र्यांनी पाठलाग करून आज सायंकाळी गावालगतच गट नंबर 115 मध्ये शाळे जवळ चितळाची शिकार केली.

या बाबतची माहिती मिळताच तळोधी बाळापूर चे वन परिक्षेत्र अधिकारी के.आर.धोंडने, क्षेत्र सहाय्यक के.डी.गरमडे, गंगासागर हेटी चे वनरक्षक, एस.एस. कुळमेथे, यांनी वन्यजीव प्रेमी, यश कायरकर , दिलीप गायकवाड, सरपंच गंगासागर (हेटी) यांच्या उपस्थितीत मोक्का पंचनामा करून, वन विभागाची रोपवाटीका सावरगाव येथे शवविच्छेदन करन्याकरीता मृत चितळाला आणण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here