तळोधी बाळापुर वनपरिक्षेत्रात PRT सदस्यांना मार्गदर्शन व स्मार्ट स्टिक वाटप

0
264

तळोधी बा.

ब्रह्मपुरी वनविभाग ब्रह्मपुरी अंतर्गत तळोधी बाळापुर वनपरिक्षेत्रातील सावरगाव रोपवाटिका येथे PRT सदस्यांना मानव-वन्यजीव संघर्षा बद्दलचे मार्गदर्शन व स्मार्ट स्टिक चे वाटप व हाताळणी बद्दल सविस्तर माहिती देण्यात आली.
सदर माहिती तळोधी वनपरिक्षेत्रातील संपूर्ण 23 PRT (प्राथमिक कृती दल) सदस्यांना उन्हाळ्यात जंगलात लागणारा वनवा, तेंदू पत्ता व मोहफुल गोळा करण्याच्या हंगाम सुरू होत असल्याने, मानव-वन्यजीव संघर्ष, यात मनुष्यहानी या बाबत घ्यावयाची काळजी व जंगल परिसरातील गावात जाऊन लोकांशी समन्वय साधने, या मार्फतीने मानव-वन्यजीव संघर्ष व मनुष्यहानी टाळणे, शिकारीवर व जंगलातील अवैध लकडा तस्करीवर नियंत्रण ठेवणे, याकरिता चे कर्तव्य व उन्हाळ्यात जंगलात लागणाऱ्या वनव्या च्या घटना कमी करणे व त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी वन विभागास सहकार्य करणे. या अनुषंगाने मार्गदर्शन करण्यात आले.
सोबतच वनविभागा मार्फत नुकत्याच मिळालेल्या स्मार्ट स्टिक बद्दल सविस्तर माहिती पुरविण्यात आली. ही माहिती ब्रह्मपुरी वन विभागाचे बायोलॉजिस्ट ‘राकेश आहुजा’ यांनी दिली व तळोधी बाळापुर वनपरिक्षेत्राला 13 स्मार्ट स्टिक पुरविण्यात आली.
सोबतच पी.आर. टी. चे कर्तव्य वनविभागाला सहकार्य करणे. परिसरातील लोकांसी समन्वय साधने व जंगलातील तस्करी वर नियंत्रण ठेवण्यासाठी काय करता येईल. याबद्दल उपस्थितांना तळोधी बा. वन परिक्षेत्राचे प्रभारी वनपरिक्षेत्र अधिकारी  कैलास आर. धोंडने यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी उपस्थित तळोधी बाळापुर वनपरिक्षेत्रातील 3 क्षेत्र सहाय्यक, संपूर्ण वनरक्षक, वनमजूर व संपूर्ण 23 पी.आर. टी. चे कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here