ताडोबा मध्ये राष्ट्रीय शहीद दिन  संपन्न

0
764

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर अंतर्गत मोहर्ली (वन्यजीव) वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या पटांगणात “राष्ट्रीय वन शहीद दिन” निमित्त स्वर्गीय स्वर्गीय जानिकराम मसराम हत्ती चाराकटर यांचे कर्तव्यावर असताना हत्ती द्वारे दि.16 नोव्हेंबर 2019 रोजी दुःखद निधन झाले / शहीद झाले म्हणून त्यांच्या प्रतिमेला नंदकिशोर काळे उपसंचालक ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प (कोर) यांच्या हस्ते माल्यार्पण करून श्रद्धांजली देण्यात आली.
श्रद्धांजली कार्यक्रमास मोहर्ली कोअर व बफर तसेच व्याग्र संरक्षण दल अधिकारी, कर्मचारी आदि उपस्थित होते.
राष्ट्रीय वन शहीद दिनानिमित्त नंदकिशोर काळे उपसंचालक कोर यांनी उपस्थितांना सखोल मार्मिक मार्गदर्शन केले. तसेच संचालन विलास कोसनकर क्षेत्र सहाय्यक व आभार प्रदर्शन प्रवीण शिरपूरकर वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here