वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार

0
377

बफर वनपरिक्षेत्र मुल अंतर्गत काटवन नियतक्षेत्रातील कक्ष क्रमांक 756 मध्ये चिंचोली येथील गुराखी स्वतःची गुरे चरण्यासाठी घेऊन गेले असता जंगलात दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना दि. 10 ऑक्टोबर दुपारी 3.30 वाजताच्या सुमारास उघडकीस आली. मृतकाचे नाव राजेंद्र नामदेव ठाकरे वय (42) वर्ष रा. चिचोली.

वाघाने हल्ला करताच त्याने आरडाओरड केला त्याचा आवाज ऐकूम काही अंतरावर गुरे चरणाऱ्या अन्य गुराख्याचे ती घटना लक्षात येताच त्यांनी घटनेची माहिती मृतकाच्या कुटुंबीयांना दिली व तसेच वन विभाग आणि पोलिसांनाही कळविण्यात आले.
वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी जी. आर. नायगमकर, क्षेत्ररक्षक जोशी आणि वनरक्षक बंडू परचाके पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने राजेंद्र ठाकरे यांचा शोध किती घेतला घटनास्थळापासून काही अंतरावर मृतकाचे मृतदेह आढळून आले वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मोका पंचनामा करून राजेंद्र ठाकरे यांचे पार्थिव शवविच्छेदन करून कुटुंबीयांना देण्यात आले
वनविभागाच्या वतीने तातडीची मदत म्हणून 25000 रु मृतकच्या पत्नीला देण्यात आली.
वाघाच्या हल्ल्यात घरातील कर्ता पुरुष गेल्याने मृतकाचे कुटुंब उघड्यावर पडल्याने वन विभागाने त्यांना मोठी आर्थिक मदत द्यावी व वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here