
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प (कोअर), चंद्रपुर अंतर्गत मोहर्ली, ताडोबा, कोळसा, कारवा, कोलारा वनपरिक्षेत्रातील गवत कुरणे सुधारित विकासासाठी मोहर्ली येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असून ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प क्षेत्र संचालक डाॅ. जितेंद्र रामगांवकर , उपसंचालक ( कोर) नंदकिशोर काळे , डाॅ. मुरतकर गवत तज्ञ यांनी मार्गदर्शन केले.
कुरण नोंदवह्या ईतंभुत माहिती भरून जपण्याच्या सुचना क्षेत्रीय कर्मचार-यांना देण्यात आले.
कार्यक्षेत्रातील गवत कुरणात प्रत्यक्ष भेटी देऊन (मोहर्ली – खातोडा मुख्य रस्त्यालगत, कं.नं. 128, पळसगांव गांवठान) डाॅ. मुरतकर गवततज्ञ, उपसंचालक ( कोर) नंदकिशोर काळे यांनी गवताच्या प्रजाती, खाद्य-अखाद्य, मित्र-शत्रू गवतांची ओळख, बी गोळा करण्याचा कालावधी , बी गोळा करून साठविणे, बी पेरणी कुठे व कशी इत्यादी कुरण व्यवस्थापन माहिती प्रदान केली. ड्रोन द्वारे फोटोग्राफी करण्यात आली.
सदर कार्यशाळेला मोहर्ली, ताडोबा, कोळसा, कोलारा, कारवा वनपरिक्षेत्रातील क्षेत्रीय कर्मचारी – अधिकारी, वरिष्ठ उपस्थित होते.
