शेतात कापूस वेचत असताना शेतकऱ्यावर वाघाने हल्ला करून गंभीर जखमी केले

0
163

वरोरा :

वरोरा येथील बोरगाव शेतशिवारात कापूस वेचत असताना शेतकऱ्यावर वाघाने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना दिनांक 11 नोव्हेंबर 2021 रोजी उघडकीस आली. गंभीर जखमी असलेल्या शेतकऱ्याचे नाव नामदेव कटू गराटे वय (70) वर्ष आहे.
तो आपल्या बोरगाव पांदण रोडवरील शेतात कापूस वेचत असताना वाघाने मागून येऊन त्यांचावर हल्ला केला. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे नामदेव गराटे घाबरून जोरजोरात आरडाओरड केले असता जवळील काम करीत असलेले लोक धावत आले व त्यांनी आरडाओरड करून वाघाला पळून केला.
नामदेव गराडे यांना उपजिल्हा रुग्णालय, वरोरा येथे उपचारासाठी दाखल केरण्यात आले आहे.
वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटना स्थळी जाऊंन पंचनामा केला व त्यांच्या माहितीनुसार त्या परिसरात मागील सात आठ दिवसापासून वाघ फिरत होता
त्यामुळे परिसरातील नागरिकां मध्ये भीतीचे वातावरण आहे आणि सध्या कापूस वेचणी चे काम व गहू आणि चणा पेरणीचे काम सुरू असताना वन विभागाने काही उपाययोजना करावी अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here