आलेवाही बीटात ६ लाकुड चोरांवर कार्यवाही

0
318

तळोधी बा.:
तळोधी बाळापुर वनपरिक्षेत्र अंतर्गत आलेवाही बीटा मध्ये वन विभागाची वन्यजीव प्रगणना सुरू असतानाच, जंगलामध्ये भ्रमंती करताना बरेच दिवसापासून नजरेत असलेले वाढोणा येथील लाकडी चोरणारी ‘आदे’ टोळी ला पकडण्यात आले.


यावेळेस लाकडे तोडणाऱ्याचे  सर्वांच्या कुराडी व सायकली जप्त करण्यात आल्या. काही दिवसापूर्वी या जंगलामध्ये असलेले वनरक्षक गेल्या नंतर प्रभारी वनरक्षक असल्याने या लाकूड तस्करी करून विकणाऱ्या लोकांना रान मोकळे झाल्याचे वाटले व त्यांनी जंगलातून लाकडे तोडून गावागावात जाऊन विकण्याचा सपाटा सुरू केला. मात्र वन विभागाला याचा सुगावा लागताच, त्यांनी काही दिवसांपूर्वी जंगलामध्ये सोळा जणांवर कारवाई करून त्यांचे अवजार व सायकली जप्त केल्या होत्या.  मात्र ही नावाची त्यावेळेस जंगलातून पसार होण्यात यशस्वी झाली होती तेव्हा पासून या टोळी वर वनविभागाची नजर होती. लकुड तस्करी करून जळाऊ लाकडे विकणाऱ्या या जलाऊ लाकडे विकणाऱ्या टोळीचे लोक हे एकदम घोर अंधार असताना पहाटेला 3.30 ते 4.00 वाजताच जंगलांमध्ये जात असतात. या जंगलामध्ये अस्वल , बिबट्या, वाघ यांचे वावर असतानासुद्धा जीवाची पर्वा न करता हे लोक जंगलात प्रवेश करतात. मात्र जर काही दुर्घटना झाली तर मात्र वनविभागाला व वन्यप्राण्यांना याकरिता दोषी ठरवत असतात ‌12 मार्च 2022 रोजी प्रगणना करत असताना सकाळी  8.00 वाजताच्या दरम्यान जंगलामध्ये लाकडे तोडत असतानाच या सर्वांना पकडण्यात आले व तोडण्याचे हत्यार व सायकली जप्त करून मोका पंचनामा करून सर्वांचे बयान नोंदवून त्यांना सोडण्यात आले. ही कारवाई  शरद आदे,  शतीष आदे, विनोद आदे,  रामदास ठाकरे,गणपत कापगते, रमेश डोंगरवार,  यांचेवर
आलेवाही बिटाचे प्रभारी वनरक्षक  एस. बी. पेंदाम यांनी केली. यावेळेस वन मजूर देवेंद्र ऊईके, अजय बोरकर रामदीन, सचिन इत्यादी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here