जिल्हा प्रतिनिधी (यश कायरकर):-
रत्नपुर कडून नागभिडकडे दुचाकीने जात असताना रानटी डुकराच्या धडकेत युवक गंभीर जखमी.
सदर घटना दि.१३ जून २०२२ रोजी सायंकाळच्या सुमाराला घडली असून यात गंभीर जखमी असलेला युवकाचे नाव हिमांशू पप्पू देशपांडे आहे व त्याचे वय 19 वर्ष असून तो रत्नापूर येथील रहिवासी आहे.
प्राप्त माहितीनुसार हिमांशू रत्नापूर वरून दुचाकी गाडी क्र. एम.एच.४९ – ए.एच.-६८१२ ने नागभीड कडे जात असताना सायंकाळी ७.०० वाजता सुमारास नागपुर मुल राज्य मार्गावरील चिंधी चक बस स्टॉप जवळ, घोडाझरी अभयारण्यातून सुसाट वेगाने रस्त्यावर धावत येऊन रानटी डुकराने त्याच्या दुचाकीला धडक दिल्याने दुचाकी स्वार अनियंत्रित होऊन पडला व गंभीर जखमी झाला.
त्याला नागभीड पोलिस स्टेशनचे निरीक्षक राजू मेंढे यांच्या मार्गदर्शनात राजू सावसाकडे हवालदार यांनी हिमांशूला जखमी अवस्थेत नागभीड ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्याला पुढील उपचारासाठी ब्रह्मपुरी येथे रेफर करण्यात आले.
सदर घटनेत दुचाकीच्या धडकेत रानटी डुक्कर हा जागीच ठार झाला.
वन विभागाला घटनेची माहिती होताच नागभीड क्षेत्राचे क्षेत्र सहाय्यक नेरलावार यांनी घटनास्थळी भेट देऊन, मौका पंचनामा करून रानटी डुक्कराची योग्य विल्हेवाट लावली. अशा प्रकारच्या अपघातीचे प्रमाण फार वाढले असून हप्त्यातून २ ते ३ अपघात होतच असतात. कधी वन्यजीव तर कधी मानवांना आपला जीव गमवावा लागतो. त्यामुळे ग्रामस्थ व वन्यजीव प्रेमींचे म्हणणे आहे की घोडाझरी अभयारण्याच्या भागातून उड्डाणपूल होणे अत्यंत आवश्यक आहे जेणेकरून अपघातीचे प्रमाण कमी होईल तेव्हा प्रशासनाने यावर लक्ष द्यावे.