एक अज्ञात वेगवान वाहनांच्या अपघातात मादा काळवीट (Blackbuck) जागीच ठार

0
604

भंडारा :- भंडारा येथील गोपीवाडा रोडवर रात्री एका अज्ञात वेगवान वाहनांच्या अपघातात मादा काळवीट (Blackbuck) जागीच ठार झाल्याची घटना दि. १३ जून २०२२ रोजी रात्री १०.०० वाजताच्या सुमारास उघडकीस आली.

सदर घटनेची माहिती (PSBS) पर्यावरण संरक्षण बहुउद्देशीय संस्थाचे प्रणय ढोमने व डॉ. शुभम ढोमने यांनी  घटनेची माहिती वनविभागाला दिली व काही वेळातच वनविभागाची टीम घटनास्थळी दाखल झाली व मौका पंचनामा केला व पुढील तपास सुरू आहे

काळवीट (Blackbuck) प्राणी एक दुर्मिळ प्रजाती आहे. जे देशाच्या १३ राज्यांमध्ये लहान विखुरलेल्या कळपांमध्ये जिवंत आहे. अशा दुर्मिळ प्रजातीचा अपघातात मृत्यू झाल्याने वन्यजीव प्रेमींमध्ये खळबळ उडाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here