ताडोबा मधील 13 पर्यटन गेट (बफ़र) चे ऑनलाइन सफारी बुकिंग उपलब्ध 

0
486

चंद्रपुर:
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील बफर झोन मधील निसर्ग पर्यटन सफारी ऑनलाईन करण्यात येत आहेत ताडोबा पर्यटन कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दिनांक 14 एप्रिल 2021 पासून बंद ठेवण्यात आले होते.
कोरोना काळात काही प्रमाणात शिथिलता दिल्याने व प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) नागपूर यांनी दिनांक 24 जून 2021 ला सर्व अटी व शर्तीनुसार पर्यटन सुरू करण्याचे आदेश देण्यात आले होते त्याअनुषंगाने दिनांक 28 जून 2021 पासून बफ़र पर्यटन ऑफलाइन पद्धतीने सुरू करण्यात आले होते या दरम्यान पर्यटन गेटवर पर्यटकांची फार मोठ्या प्रमाणात गर्दी होत होती तसेच  सोशल डिस्टन्सचा पालन होत नसल्याने या सर्वावर खबरदारीचा उपाय म्हणून आज दिनांक 15 जुलै 2021 पासून ऑनलाईन बुकिंग www.mytadoba.org  या संकेत स्थळावर सुरु करण्यात आले आहे.
बफर झोन मधील मान्सून सफारी 16 जुलै ते 30 सप्टेंबर 2021 पर्यंत सुरु ठेवण्यात येत आहे. तसेच बफ़र पर्यटन मध्ये 14 गेट आहेत त्यापैकी 13 पर्यटन गेट सुरू करण्यात येत आहे यात आगरझरी,  देवाळा-आडेगाव, जुनोना, कोलारा, मदनापूर, अलिझंझा, नवेगाव, रामदेगी, निवढेला, पांगडी, मामला, झरीपेठ, केसलाघाट, सिरकाङा है आहेत.
तसेच मान्सून पर्यटनात काही अटी व शर्ती ठेवण्यात येत आहेत सफारी मध्ये एका कुटुंबाचे 6 व्यक्ती असल्यास एका जिप्सी मध्ये प्रवेश दिले जाणार आहे. वेगळ्या कुटुंबाचे असल्यास एका जिप्सी मध्ये फक्त 4 पर्यटकांना प्रवेश दिले जाईल.
सफारी वेळ सकाळी 6 ते 10  व दुपारी 2.30 ते 6.30 पर्यंत राहणार ऑनलाइन चार्जेस एट्री फी 1000 रु. जिप्सी फी 2500 रु. मार्गदर्शक फी 500 रु. असे एकूण 4000 रु. फी राहतील.

मान्सून सफारी दरम्यान पर्यटकास मोबाईल नेण्यास बंदी राहील पर्यटन रोडचे स्थिती लक्षात घेता फक्त जिप्सी चालक व गाईड यांना मोबाईल वापरण्याची परवानगी राहील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here