मोहर्ली येथे कोविड-19 RT-,PCR चाचणी ची सुरुवात

0
544

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी चंद्रपूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 आणि साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 अन्वये प्रतिबंधात्मक उपाय योजनाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आलेले आहेत सध्याच्या स्थितीत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याचे आढळून येत असल्याने व कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करणे अत्यावश्यक असल्याने आज दिनांक 16 मार्च रोजी ताडोबा टायगर व्हॅली रिसॉर्ट येथे कोविड-19 RT-,PCR चाचणी धनंजय बापट रॉयल टायगर रिसॉर्ट व वनविभाग  यांच्या मार्फत घेण्यात आले.
कोविड-19 RT-,PCR चाचणी करिता प्राथमिक आरोग्य केंद्र , दुर्गापुरचे डॉ.आशिष वाकडे पशुवैद्यकीय अधिकारी, संदीप मून कंप्यूटर ऑपरेटर, स्टाफ नर्स पूजा डे, पुनम कोवे आदि उपस्थित होते.
दररोज अनेक पर्यटकाच्या संपर्कात येत असल्याने त्यांची कोविड-19 RT-,PCR चाचणी करण्यात आली.

कोविड-19 RT-,PCR चाचणीच्या पाहणी करिता वन विभागा मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक डॉ जितेंद्र रामगांवकर व ताडोबा कोर ACF खोरे यांनी केले.
डॉ जितेंद्र रामगांवकर यांनी सर्व गाईड व ड्राइवर ला कोविड-19 RT-,PCR चाचणी करने अनिवार्य आहे अन्यथा त्यांना ताडोबा मध्ये प्रवेश दिला जाणार नाही असे त्यांनी यावेळी म्हटले.

मोहर्ली येथील ताडोबा कोरचे 18 पर्यटक मार्गदर्शक, 21 जिप्सी ड्रायव्हर, रिसोर्ट मध्ये काम करणारे 61 तसेच जुनोंना बफरचे नाईट सफारी महिला गाईड 5 असे ऐकूण 105 लोकांनी लाभ घेतला. या मध्ये रॉयल टाइगर रिसोर्ट, टाइगर विलेज, ताडोबा टाइगर वैली रिसोर्ट, होटल टाइगर इन, सारस रिसोर्ट च्या सर्व कर्मचारी ने कोविड-19 RT-,PCR चाचणीचा लाभ घेतले.

कोविड-19 RT-,PCR चाचणी शिबीराला सहकार्य करणारे रॉयल टाइगर मैनेजर रवि गेडाम, ताडोबा टाइगर वैली मनोज सिंग, वनविभागाचे राउंड ऑफिसर मल्लेलवार यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here