वन विभागामार्फत जंगलात वन्यप्राणी प्रगणना सुरू; महिला वनरक्षकाच्या मृत्यूमुळे या वर्षी प्रगणनात उशिर

0
672

यश कायरकर (जिल्हा प्रतिनिधी):

वन विभागा मार्फत जंगलात जंगलात वन्य प्राणी प्रगणना सुरू असुन. महिला वनरक्षकाच्या मृत्यूमुळे यावर्षी  ही उशिरा प्रगणना करण्यात आली. दरवर्षी ही गणना  नोव्हेंबर – डिसेंबर महिन्यामध्ये, हिवाळ्याच्या दिवसांमध्ये केली जाते.


यात जंगलातील मासभक्षी, तृणभक्षी, प्राण्यांची गणना जंगलामध्ये भटकंती करून केली जाते. परंतु यावर्षी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये या वर्षीची प्रगणना सुरू असताना‌ वनरक्षक ‘स्वाती डुमणे’ मॅडमचा ताडोबा मध्ये एका वाघिणीचा हल्ल्यात मृत्यू झालेला होता. त्यामुळे वन विभागाने नोव्हेंबर – डिसेंबर मध्ये सुरू झालेली गणना थांबवून. वनकर्मचारी त्यांच्या सुरक्षेबाबत मंथन करून संपूर्ण वन कर्मचाऱ्यांना स्मार्ट स्टिक पुरवून आत्ता परत वन्यप्राणी गणना सुरू करण्यात आली.


या अनुषंगाने संपूर्ण देशभर चालणाऱ्या या प्रगणने मध्येच ब्रह्मपुरी वनविभाग ब्रह्मपुरी, वनपरिक्षेत्र तळोधी बाळापुर येथेही हि गणना सुरू करण्यात आली आहे. ‌ सहा दिवस चालणाऱ्या या गणनेमध्ये पहिल्या 3 दिवसांमध्ये मासभक्षी -प्राण्यांची गणना करण्यात येते व शेवटचे 3 दिवस तृणभक्षी प्राण्यांची गणना या पद्धतीने दोन टप्प्यांमध्ये ही गणना करण्यात येते.
मासभक्षी-प्राण्यांची गणना करताना. जंगलातील पायवाटेने  पाच ते सात किलोमीटरचा परिसर हररोज पायदळ फिरून रस्त्यात व आजूबाजूला भेटलेले पदचिन्ह, विष्टा, झाडावरील – जमीनीवरील खुणा, इत्यादी प्रकारच्या अस्तित्वाच्या खाना-खुणांच्या द्वारे नोंदणी केली जाते.
त्यानंतर तीन दिवस तृणभक्षी प्राण्यांची गणना करण्यात येते. हे तीन दिवस जंगलाच्या मधोमध असलेल्या संरक्षण रेषा (ट्रांजेक्ट लाईन) ने फिरत वृक्ष, औषधी वनस्पती, तृणभक्षी प्राणी, खाना-खुणा, लेंड्या विष्टा द्वारे यांच्या नोंदी करण्यात येते.
अशा प्रकारे चाललेल्या या वन्यप्राणी प्रगणनेचा आज दि.16 मार्च 2022 रोजी समारोप करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here