
तळोधी बा.
वनविभागाच्या तळोधी बाळापुर वनपरिक्षेत्रातील गाडी क्रमांक MH -34 -AB- 6890, चे दिनांक 17 मार्च 2022 रोज दुपारच्या सुमारास तळोधी वरुन सिंदेवाहीला जात असताना सिंदेवाही पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पळसगाव जाट जवळील नाल्याच्या पुलावर गाडीच्या समोरील डाव्या बाजूच्या टायर फुटल्याने गाडी नियंत्रित होऊन पुलाच्या कळेला आदळल्याने अपघात झाले. यात कार चालक दिपक बारसागडे याला किरकोळ जखम झाली.
सिंदेवाही पोलीसांनी मौका पंचनामा करून गाडी वनविभागाच्या सुपूर्द केली, त्यानंतर सावरगाव येथील रोपवाटिकेमध्ये गाडी ठेवण्यात आली.
मात्र होळी व उन्हाळ्याच्या संवेदनशील वेळी च गाडीचे अपघात झाल्यामुळे तळोधी वनपरिक्षेत्र आता अपाहीजच झालाय. त्यामुळे गाडी तात्काळ दुरुस्त करून किंवा वन विभागाने दुसरी गाडी उपलब्ध करून देणे अत्यंत गरजेचे आहे.
कारण संपूर्ण चंद्रपूर मध्ये ब्रह्मपुरी वनविभागातील तळोधी बाळापूर वनपरिक्षेत्र हे अत्यंत संवेदनशील क्षेत्र म्हणून मानले जाते. त्यामुळे गस्ती करिता या परिक्षेत्रात 24 तास गाडी उपलब्ध असणे अत्यंत आवश्यक आहे.
