रानटी हत्तीच्या हमल्यात वनविभागाचे वाहन चालकाचा मृत्यू

0
1079

(गडचिरोली जिल्ह्यातील वडसा वन विभागातील घटना)

गडचिरोली (यश कायरकर);
गडचिरोली जिल्ह्यातील वडसा वन विभाग वडसा अंतर्गत येणाऱ्या आरमोरी वन परिक्षेत्रा अंतर्गंत पळसगांव नियत क्षेत्रात कक्ष क्र.85 मध्ये हत्तीचे हल्यात वाहन चालक सुधाकर आत्राम यांचा जागेच मृत्यू झाला.
सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की, आसाम कडून आलेले हत्ती गत वर्षभरापासून गडचिरोली जिल्ह्याच्या काही परिसरामध्ये भटकत असून त्यांनी वळसा वन विभाग वडसा अंतर्गत हद्दीत आरमोरी परिसरामध्ये उत्पाद माजविलेला आहे. त्यामुळे या परिसरामध्ये हत्त्यांच्या हमल्या पासून परिसरातील लोकांचे संरक्षण व त्यांच्या कळपावर निगराणी करण्याकरिता वनविभागाने गस्त वाढवलेली आहे.
यातच आज दि.16 सप्टेंबर 2023 रोजी आरमोरी परिसरामध्ये गस्तीवर असताना हत्तीचे संरक्षण दला सोबत वडसा वन विभागातील आरमोरी परिक्षेत्रा अंतर्गंत पळसगांव नियत क्षेत्रात कक्ष क्र.85 मध्ये गस्तीवर असलेल्या दलावर अचानक झालेल्या हत्तीचे हल्यात वाहन चालक सुधाकर आत्राम यांचा मृत्यू झाला.
या घटनेने वनविभागात खळबळ उडाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here