मातृदिना निमित्त पेरजागड डोंगर परिसर प्लास्टिक मुक्त करण्यात आला ; ‘स्वाब’ संस्थेचे उपक्रम

0
67

चंद्रपूर : ब्रम्हपुरी वन विभाग ब्रह्मपुरी च्या तळोधी बा. वन परिक्षेत्रात सक्रिय सहभाग असलेल्या ‘स्वाब नेचर केअर संस्था’च्या सतत राबविण्यात येणाऱ्या ‘प्लास्टिक मुक्त पर्यावरण’ या अभियाना अंतर्गत मातृदिना निमित्त धरती ही आपली माता आहे. तर मातृदिन निमित्ताने पुन्हा नेहमीप्रमाणे पेरजागड (सात बहिणी डोंगर) परिसर पायथ्यापासून तर शिखरापर्यंत प्लास्टिक कचरा गोळा करून संपूर्ण परिसर प्लास्टिक मुक्त करण्यात आला.

विशेष म्हणजे  8 एप्रिल 2023 ला झालेल्या मधमाशांच्या हमल्यात 2 दोन पर्यटक मरण पावले होते, तेव्हा पासून पर्यटकांच्या सुरक्षे करिता वनविभागाने डोंगरावर पर्यटकांना जाण्यास बंदी लावून त्या ठिकाणी वन विभागामार्फत रेलिंग लावण्यात आले. मात्र आता तिथे कोणतेही पर्यटक जात नसल्यामुळे त्या संस्थेने वन विभागाची रीतसर परवानगी घेऊन तो संपूर्ण सात बहिणी डोंगर शिखरावरील परिसर स्वाब च्या स्वच्छता मित्रांनी घेऊन प्लास्टिक मुक्त केला. मात्र यावेळेस डोंगर परिसरात प्लास्टिकचा कचरा हा अत्यंत कमी प्रमाणात आढळून आला.
मात्र एवढे करून ही पर्यटनासाठी जाणारे लोक व जंगलातील रस्ते, पर्यटन परिसरातून फिरणारे लोक,  सोबत आणलेल्या पाण्याच्या, दारुच्या बॉटल्स, प्लास्टिक पिशव्या, कुरकुरेच्या पिसव्या आणि खाद्यपदार्थाच्या प्लेट्स, मोठ्या प्रमाणात रस्त्याच्या कडेला, जंगल परिसरातच फेकून देतात. त्यामुळे ते खाऊन कित्येक  मुक्या प्राण्यांना आपले प्राण गमवावे लागत असेल, तसेच पर्यावरणात हा प्रदूषण पसरल्याने पर्यावरण व जंगलाचीही बहुत मोठी हानी होतं असते. यामुळे शासनाने  प्रत्यक्षात पर्यावरणामध्ये असलेल्या प्लास्टिक प्रदूषणाबद्दल गांभीर्याने विचार करून, पर्यावरण रक्षणासाठी यावर तात्काळ उपाय करणे गरजेचे आहे.


‘स्वाब नेचर केअर संस्थे’ द्वारे आपल्या परिसरातील जंगल परिसरात असलेल्या पर्यटन स्थळी जाऊन, रस्त्याने फिरून, आजूबाजूला पसरलेला प्लास्टिक कचऱ्याची विल्हेवाट लावण्याकरिता व पर्यावरण प्लास्टिक मुक्त करण्याकरता ही  *’प्लास्टिक मुक्त पर्यावरण’* ही मोहीम सतत श्रमदानातून राबविली जाते.
मात्र वन विभागाने हा परिसर अत्यंत धोकादायक असल्याने प्रवेश बंदी करून ही त्या ठिकाणी बळजबरीने काही पर्यटक आपले व आपल्या परिवाराचे सोबत येणाऱ्या महिलांचे प्राण धोक्यात घालून जात असल्याचे निदर्शनास आले.
यावेळी पेजागड (सात बहिणी) डोंगरावर पर्यटनाकरिता आलेल्या पर्यटकांना पर्यावरणाला हानिकारक प्लास्टिक प्रदुषण बद्दल माहिती देऊन “प्लास्टिक कचरा जंगलात, पर्यावरणात कुठेही न फेकता तुम्ही आपल्या सोबत परत घेऊन जाऊन कचरा पेटीत टाका. हीच आम्हाला व पर्यावरणाला तुमची मोलाची मदत ठरेल.” असे सांगून पर्यटकांचे मार्गदर्शन स्वाब संस्थेचे अध्यक्ष ‘यश कायरकर’ यांनी केले.
यावेळी स्वच्छता मित्र म्हणून  छत्रपती रामटेके,  विनोद लेंडगुरे,  जीवेस सयाम,  राशिद शेख,  विकास लोनबले, आकाश मेश्राम, तुषार शिवरकर, पंकज कुंभारे, हिमांशू पारधी, हिमांशू बावनथडे, आकाश मेश्राम, महेश बोरकर, वेदप्रकाश मेश्राम, हितेश सहारे, प्रशांत सहारे, कृणाल रामटेके, सुरज गेडाम ,स्वप्निल बोधनकर, वन विभागाचे वनरक्षक सुशांत गौरकर, संस्था चे अध्यक्ष यश कायरकर  ‘स्वाब’ संस्थेचे सदस्य तथा स्वच्छता मित्रांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here