वाघाच्या हल्ल्यात एक महिला ठार ; सावली वनपरिक्षेत्रातील घटना

0
158

जिल्हा प्रतिनिधी (यश कायरकर) : 

सावली वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या व्याहड खुर्द उप वनक्षेत्रातील वाघोली बुटी येथे  प्रेमीला मुकरु रोहनकर महिलावर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना उघडकीस आली.
प्राप्त माहितीनुसार आज दि. २० मई २०२३ रोजी शेतात काम करण्यास गेली असता त्या परिसरात अचानक वाघाने हल्ला करून जागीच महिलेस ठार केले.
सदर घटनेची माहीती  वनविभागाला व पोलीस विभागाला मिळताच घटनास्थळी दाखल झाले व मौका पंचनामा करून शव विच्छेदन करिता पाठविण्यात आले.
सावली वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या व्याहड खुर्द उप वनक्षेत्रातील वाघोली बुटी येथे एका आठवड्यात दुसऱ्यादा वाघाच्या हल्ल्याची घटना घडल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे व वाघाच्या बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थ करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here