वाघाच्या हल्ल्यात शेतात काम करणारी महिला ठार

0
624

मूल तालुक्यातील मौजा कोसंबी शेतामध्ये लाखोरी खोदत असताना अचानक वाघाने पाठीमागून येऊन एका महिलेवर हल्ला करून ठार केल्याची घटना आज दि. 18 फरवरी 2022 रोजी दुपारी 4 वाजताच्या सुमारास उघडकीस आली.

सदर घटनेत मृत महिलेचे नाव सौ.ज्ञानेश्वरी वासुदेव मोहूर्ले, वय 55 वर्ष राहणार मौजा कोसंबी असून ते आपल्या स्वतःच्या शेतात काम करत असताना अचानक पाठीमागून येऊन वाघाने हल्ला करून जवळपास 50 मीटर अंतरावर ओढत नेले.
सदर घटनेची माहिती कोसंबीच्या ग्रामस्थांना होताच गावातील होतकरू सरपंच रविंद्र कांमडी पोलिस  पाटील अर्चना मोहूर्ले, सारिका गेडाम व गावकरी घटनास्थळी दाखल झाले व घटनेची माहीती पोलीस आणि वनविभागाला देण्यात आली. माहीती होताच ठाणेदार सतिशसिंह राजपूत आणि वनपरिक्षेत्र अधिकारी प्रियंका वेलमे, क्षेत्र सहाय्यक प्रशांत खनके, वनरक्षक राकेश गुरनुले, मरसकोल्हे यांनी घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाचा पंचनामा करुन महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. वनविभागाच्या वतीने वनपरिक्षेत्र अधिकारी प्रियंका वेलमे यांनी मृतक महीलेच्या परीवारास ३० हजार रूपयाची तातडीची मदत दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here