नीलगायीच्या शिकार मध्ये गोविंदपूरचे ५ आरोपी वनविभागाने ताब्यात

0
365

गडचिरोली जिल्ह्याच्या गोविंदपूर येथे नीलगायीची शिकार करून मांस विक्री करणाऱ्या ५ आरोपींना जेरबंद करण्यात गडचिरोली वनविभागाला यश आले आहे.
सदर घटनेतील आरोपी गोविंदपूर येथील निळकंठ भाऊराव भांडेकर, भाऊराव ढिवरू भांडेकर, धर्मा बळीराम गावडे, पत्रू बिलाजी भांडेकर, विठ्ठल गोसाई सोमनकर यांना अटक करण्यात आले आहे.

गोविंदपूर येथे नीलगायची शिकार केले असल्याची गुप्त माहिती वनविभागाला मिळाली. त्यामाहितीच्या आधारे वनाधिकारी व कर्मचाऱ्यांनी सापळा रचून दि.१७ फेब्रुवारी २०२२ रोजी गोविंदपूर गाठून पत्रुजी भांडेकर यांच्या घराची झडती घेतली असता नीलगायीचे शिजवलेले मांस त्यांच्या घरामागील कचऱ्यात फेकलेले दिसले. दुसरीकडे, ज्या ठिकाणाहून मांस खरेदी करण्यात आले, त्या ठिकाणी अधिक तपास केल्यानंतर तनासच्या ढिगाऱ्यात 4 किलो मांस लपविल्याचे समोर आले.


संबंधित वन कर्मचाऱ्यांनी नीलगायीचे मांस जप्त करून हे मांस पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.  लेखापालने फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणीसाठी पाठविण्यात आले.  दरम्यान, सदर प्रकरणात वनविभागाने सुरुवातीला 2 आरोपींना अटक करण्यात आले होते.
तसेच  तपास दरम्यान अन्य ३ आरोपींना जेरबंद करण्यात वनविभागाच्या पथकाला यश आले.
सदर घटनेची कारवाई गडचिरोली वनविभागाच्या सहाय्यक वनरक्षक सोनल भडके यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी अरविंद पेंदाम, मानद वन्यजीव रक्षक मिलिंद उमरे, वन्यजीव प्रेमी अजय कुकुडकर, गुरवलाचे क्षेत्र सहाय्यक अरुप कन्नमवार, डी.एन.  दुर्गमवार, वनरक्षक गुरु वाढई, वनरक्षक प्रियंका रायपुरे, कृष्णा मडावी,  गुरवाला निळकंठ गेडाम, मकसूद सय्यद, विलास भोयर, देविदास सोडूरवार आदि उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here