५० फुट खोल विहिरीत पडून नर काळवीटाचा मृत्यू

0
375

शेलुबाजार :

पाण्याच्या शोधात शेतशिवारात भटकत असताना विहिरीचा अंदाज न आल्याने नर काळवीट रात्री विहिरीत पडले. 17 एप्रिल रोजी रात्रि च्या समारास गोगरी येथील दिपक गारद यांच्या शेतातील विहिरीत पडून काळवीटाचा मृत्यू झाला. शेलु बाजार येथील राज पांढरे ,आदित्य इंगोले व साळुंकाबाई राऊत महाविद्यालय वनोजा च्या रासेयो च्या आपत्ति व्यवस्थापन बचाव पथक यांना माहिती दिली. माहिती वरून आदित्य इंगोले सर्व रेस्क्यू साहित्यासोबत आपले सहकारी वैभव गावंडे, प्रदीप सावळे ,सचिन राठोड व सतिष गावंडे आदि सोबत घटनास्थळी दाखल झाले. सदर घटनेची माहिती मानद वन्यजीव रक्षक गौरव कुमार इंगळे, कारंजा-मंगरूळपीर वनपरिक्षेत्राचे वनाधिकारी श्री. अमित शिंदे यांना दिली.


माहिती वरून वनविभागाचे वनपाल नवलकर, वनरक्षक पोले,व वनरक्षक सौ. अहिरे घटनास्थळी दाखल झाल्या. यानंतर वाईल्ड लाईफ कंझर्वेशन टिम वाशिम शाखा वनोजा च्या सदस्यांच्या मदतीने सदर मृत काळवीट ला बाहेर काढले. वनविभागाने रितसर पंचनामा केला व शवविच्छेदन करून येडशी येथील वनपरिक्षेत्रामध्ये मृत काळवीटाला अग्नी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here