तीन तासांच्या प्रयत्नानंतर बिबट्याला जेरबंद करण्यास वन विभागाला यश

0
443

नाशिक :
नरसिंह नगरमध्ये कॉलनी परिसरात बिबट्याचा वावर खासदार भारती पवार यांच्या घराबाहेर  बिबट्याचं दर्शन  बिबट्याचे दर्शन य्या परिसरात होताच वन विभागाला त्वरीत माहिती देण्यात आली. गंगापूर रोड वरील नृसिंह नगरात सकाळी ८.०० वाजता बिबट्याचे पहिल्यांदा रोड वर दर्शन झाले होते. वन विभाग व पोलिसांनी बिबट्या दिसल्याची खबर मिळताच आपल्या पथक सोबत दाखल झाले. वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक भदाणे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली थोरात यांच्यासह पथकाने बिबट्याची शोधमोहीम सुरु केली.


बिबट्याचे वय दोन ते अडीच वर्ष होते त्याला पकडण्यासाठी वन विभागाची टीम सेप्टी किट घालून व जाळी पकडून घटना स्थळी त्याला पकडण्याचे पर्यत्न केले. त्यानंतर 9.30 पर्यंत बिबट्याच्या पगमार्क दिसले. यानंतर ‘फुलेरिन’ बंगल्याच्या शेजारील मोकळ्या जागी बिबट्याने डरकाळी मारली. यानंतर बिबट्याचा पाठलाग सुरु झाला. सगळीकड़े संचार बंदी शुरूअसूनही बिबट्याला बघण्यास मोठी गर्दी झाल्याने वन विभागाला बिबट्याला रेस्क्यू करण्यात बरेच अडचणी चा सामना करावा लागला. सकाळी १० वाजेच्या सुमारास अक्षर धाम अपार्टमेंट मध्ये बिबट्या दबा धरुन बसला.
वन विभागाचे विवेक भदाणे यांनी बिबट्याला डॉट मारले डॉट मारतांनी बिबट्यानी त्यांचा अंगावर झेप घेतली व पायाला पंजा मरला व ते थोड़े फार जखमी झाले पण सुरक्षित आहे. यानंतर बिबट्याने चाणक्य अपार्टमेंट मध्ये धूम केली. या ठिकाणी तासभर बिबट्याने बैठक मारली. अखेरीस पुन्हा डार्ट मारुन त्याला तीन तासांच्या प्रयत्नानंतर या बिबट्याला जेरबंद करण्यास वन विभागाला यश मिळाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here