
“ते अवैद्य उत्खनन नव्हे” प्रशांत बुरडे सहाय्यक कार्यकारी अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरन, मुल.
नागभीड : यश कायरकर
नागभीड नगर परिषदेची महत्त्वाकांक्षी पाणी पुरवठा योजना लवकर पूर्ण होऊन नागरिकांना भरपूर पाणी उपलब्ध व्हावे यासाठी बांधकाम जलद गतीने सुरू आहे. या योजनेचा पाणी पुरवठ्याचा मुख्य स्तोत हा घोडाझरी तलावातून आहे. तिथे विहिरीचे बांधकाम पावसाळा सुरु होण्यापूर्वी पूर्ण करण्यासाठी सर्व प्रशासकीय मान्यता घेऊन वैधानिक/वैद्यपणे आवश्यक खोदकाम सुरु आहे. अशी माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरण चे सहा. कार्यकारी अभियंता प्रशांत बुरडे यांनी वृत्तपत्र प्रतिनिधिना आज घोडझरी तलाव येथे दिली आहे.
नुकतीच काल दि. 16 मे 2021 रोजी प्रसार माध्यमानी योग्य माहिती अभावी सदर खोदकाम अवैद्य उतखनन सुरु असल्याच्या बातम्या प्रकाशित केल्या आहे. त्यावर खुलासा देतांना प्रशांत बुरडे बोलत होते. यावेळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण चे शाखा अभियंता एस. एम. मेश्राम, उपनगराध्यक्ष गणेश तर्वेकर, बांधकाम सभापती सचिन आकुलवार, आरोग्य सभापती दशरथ उके ,नगरसेवक शिरीष वानखेडे, नगरसेवक रुपेश गायकवाड , नप अभियंता उमेश शेंडे, सेंट्रल इंडिया इंजीनियरिंग नागपूरचे ठेकेदार प्रतिनिधी वरुण मणिहार प्रशांत शर्मा यांची उपस्थिती होती.
खरे वास्तव असे आहे की नागभीड पाणी पुरवठा योजनेची विहीर ही घोडझरी तलावात मध्यभागी तलावाच्या कडेपासून 200 मीटर लांबीवर करण्यात येत आहे. प्रस्तावीत विहिरीच्या स्थळापर्यंत पूर्णतः पाण्याने व्यापला असल्याने दोन्ही बाजूने भरण टाकून विहिरीची जागा बंदिस्त व कोरडी करणे व त्यानंतर विहिरीचे खोदकाम व बांधकाम करणे शक्य आहे. 16 मिटर खोल विहिरीचे हे काम पावसाळा लागण्यापूर्वी होणे अत्यावशक आहे. तसेच या विहिरी पर्यंत 200 मिटर पुलाचे काही बांधकाम (तलावातील पाणी व्याप्त ) सुद्धा तात्काळ करावे लागणार आहे. या करिता जास्त भरनाची आवशकता आहे करिता मागील तळोधी नळ योजने च्या ठिकाणी तलाव परिसरातील होत कामातून निघालेला मुरूम या ठिकाणी ट्रक द्वारे आणण्यात आला मात्र यावर आक्षेप येताच मुरूम आणणे बंद करण्यात आले आहे. सदर खुलासेवार दिलेल्या माहिती नुसार नागभीड नगर परिषद च्या पाणी पुरवठा योजनेचे सदर बांधकाम वैद्य पणे व सर्व शासकीय मान्यता घेऊन केले जात आहे. सदर घोडझरी तलावतील विहीर व पुलाचे बांधकामात कसल्याही प्रकारे बाधा निर्माण होऊ नये यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे असे आव्हान उपनगराध्यक्ष गणेश तर्वेकर यांनी यावेळी केले आहे.
