
जिल्हा प्रतिनिधी (यश कायरकर): सिंदेवाही तालुक्यातील वनपरिक्षेत्र शिवानी येथील जादूटोण्या करिता वन्यप्राण्याची शिकार करून शेतात हाडे पुरल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. आरोपी गुन्हा करून फरार झालेल्या व कोरचीत नातेवाइकाकडे दडून बसलेल्या पितापुत्राला दि. 19 मई 2023 शुक्रवार रोज वनविभागाच्या पथकाने अटक केली.
सदर घटनेतील आरोपीचे नाव अतुल मुरलीधर गायकवाड (३३), वनविभागाचे अधिकारी तसेच कर्मचारी. मुरलीधर हरबाजी गायकवाड (६४) , दोघे रा. शिवणी, ता. सिंदेवाही, जि. चंद्रपूर अशी यांचे नावे आहेत.
३ एप्रिल २०२३ रोजी शिवणी येथे जादूटोण्यातून त्यांनी वन्यप्राण्याची शिकार करून शेतात हाडे लपवल्याची कुणकुण चंद्रपूरच्या शिवणी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना लागली होती. त्यावरून वनपरिक्षेत्र अधिकारी बी. के. तुपे यांनी शेतात व घरी छापा मारून हाडे जप्त करून दोघांवर गुन्हा नोंद करण्यात आला. तेव्हापासून ते दोघे फरार होते. ते गडचिरोली जिल्ह्यातील कोरची तालुक्यातील सोनापूर या गावांमध्ये लपून असल्याची माहिती शिवणी वनपरिक्षेत्र अधिकारी बी. के. तुपे मिळताच यांनी क्षेत्र सहायक एस. वाय. बुल्ले, वनरक्षक एल. के. मेश्राम, ए. डब्ल्यू, गायकवाड, एस. जी. चाहदे यांच्यासह कोरची गाठले.
देसाईगंजचे उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल, सहायक वनसंरक्षक मनोज चौहान यांच्या मार्गदर्शनाखाली बेडगाव वनपरिक्षेत्र अधिकारी एल. एम. ठाकरे, क्षेत्र सहायक संजय राठोड, वनरक्षक प्रकाश मगरे, विलास रंदये यांनी सापळा रचून कोरची सोनपूर गावात सापळा लावला. प्रकाश बोगा याच्या घरातून दोघांनाही ताब्यात घेतले.
विशेष म्हणजे दोघेही आरोपी हे एप्रिलच्या ३ तारखेपासून फरार असून ते वेळोवेळी आपला ठिकाण बदलत होते दीड महिन्यानंतर त्यांना परिश्रमाने अटक करण्यात सावलीचे वनपरिक्षेत्र अधिकारी तुपे यांना यश मिळालेले आहे.
