चंद्रपूर येथे ३५ वे महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलन

0
187

पक्षिमित्र संमेलन अध्यक्षपदी राजकमल जोब यांची निवड

चंद्रपूर : पक्षीमित्रांचे संघटन असलेली महाराष्ट्र पक्षिमित्र ही संस्था राज्यात गेली चार दशके कार्यरत असून, पक्षी अभ्यास, संवर्धन व जनजागृती यासाठी कार्यरत असलेल्या या संस्थेची राज्य स्तरीय तसेच विभागीय स्तरावर पक्षिमित्र संमेलने होत असतात.
अशा प्रकारचे संघटन आणि संमेलने घडवून आणणारे महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य आहे. या वर्षीचे चे ३५ वे महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलन चंद्रपूर येथे इको-प्रो या संस्थेच्या यजमानपदाखाली वन अकादमी चंद्रपूर येथे दि. ११ ते १२ मार्च २०२३ दरम्यान होत आहे.
सदर संमेलनाचे संमेलनाध्यक्ष म्हणून जेष्ठ पक्षी अभ्यासक  राजकमल जोब यांची निवड करण्यात आली.
राजकमल जोब हे पक्षिमित्र चळवळीतील जेष्ठ सभासद असून अगदी सुरुवातीच्या काळापासून या चळवळी सोबत जुळलेले आहेत. १९८२ पासून पक्षी निरीक्षणास सुरुवात करून त्यांनी भंडारा येथे प्रथमच भंडारा नेचर क्लब स्थापन करून त्या माध्यमातून पक्षी आणि पर्यावरण चळवळ निर्माण करण्यात मोलाचे कार्य केले आहे. तसेच त्यांनी आजवर संघटनेचे कार्य केलेले असून विदर्भ स्तरीय संमेलनांचे आयोजन सुद्धा केलेले आहे. १९९५ साली नागपूर येथे पार पडलेल्या चौथ्या विदर्भ पक्षिमित्र संमेलनाचे ते अध्यक्ष होते. त्यांनी भंडारा जिल्ह्याचे मानद वन्यजीव रक्षक म्हणून सुद्धा अनेक वर्षे कार्य केले असून भंडारा जिल्ह्यातील तलावांची जैवविविधता व तलावांचे पुनरुज्जीवन यासाठी भरीव कार्य केले आहे.
महाराष्ट्र पक्षिमित्र राज्य कार्यकारिणी तर्फे  राजकमल जोब यांची एक मताने निवड करण्यात आल्याची महिती संघटनेचे अध्यक्ष डॉ. जयंत वडतकर यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here