अजगर साप व त्याच्या चार पिल्लांना वनविभाग व संजीवन पर्यावरण संस्थाच्या सहकार्याने जीवनदान

0
576

मूल :

चंद्रपुर वनविभागा अंतर्गत येत असलेल्या वनपरिक्षेत्र चिचपल्ली उपक्षेत्र मुल मधील मौजा अंतरगाव-पारडवाही येथील वासुदेव गजानन चौखुंडे यांच्या शेतशिवारातील एका अजगर साप आपल्या अंड्या सोबत असल्याची माहीती वनविभाग व संजीवन पर्यावरण संस्थेचे उमेशसिंह झिरे यांना दिनांक 30 मे 2021 रोजी देण्यात आली.


सदर माहीती मिळताच क्षेत्र सहाय्यक पी.डी.खनके व वनरक्षक सुभाष मरसकोल्हे व संजीवन पर्यावरण संस्थेची चमु चौखुंडे यांच्या शेतशीवारात जाऊन पहाणी केली असता शेतातील पाळी जवळच्या खड्यात एक अजगर व त्याचे अंडे असल्याचे निदर्शनात आले. वनकर्मचारी व संजीवन संस्थेच्या सदस्यांनी शेतमालक चौखुंडे यांना त्या अजगराला अंड्यातुन पील्ले नीघे पर्यंत तिथेच राहु देण्याची विनंती केली. पण भीती पोटी शेतमालकाने अजगराला शेतात राहु देण्यास असमर्थता दर्शवली व अजगराला शेतातुन पकडुन नेण्याची विनंती केली.
सदर घटनेची माहीती चंद्रपुर वनविभागाच्या विभागीय वनाधिकारी कु.सारीका जगताप, सहाय्यक वनसंरक्षक श्रीनीवास लखमावाड व चिचपल्लीचे वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव राजुरकर यांना देण्यात आली व त्यांचा मार्गदर्शनात त्या अजगराला क्षेत्र सहाय्यक पी.डी. खनके वनरक्षक सुभाष मरसकोल्हे यांच्या उपस्थीतीत संजीवन पर्यावरण संस्थेचे सदस्य प्रशांत मुत्यारपवार, तन्मयसिंह झिरे, मनोज रणदिवे,स्वप्नील आक्केवार, प्रशात केदार,अंकुश वानी, दिनेश खेवले यांनी अजगराला सुरक्षीतपणे पकडले व अजगराचे अंडे ताब्यात घेतले .

सदर अजगराला वनकर्मचारी व संजीवन पर्यावरण संस्थेच्या सदस्यांच्या उपस्थीतीत सुरक्षीतपणे कक्ष क्रमांक 751 मध्ये निसर्ग मुक्त करण्यात आले. अजगराच्या अंड्याला वनाधिका-यांच्या मार्गदर्शनात वनकर्मचारी व संजीवन पर्यावरण संस्थेच्या देखरेखी खाली ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. जवळपास 45 दिवसाच्या आत त्या अंड्याची योग्य काळजी घेतल्या नंतर पंधरा ते सोळा अंड्यातुन दिनांक 20 जुलै 2021 ला चार अजगराची पील्ले अंड्यातुन निघाली.
या घटणेमुळे वनकर्मचारी आणी संजीवन संस्थेच्या संदस्यामधे आनंदाचे वातावरण निर्मान झाले. कृत्रीम रित्या अजगराचे अंडे उबवुन पील्ले निघण्याची ही मुल तालुक्यातील पहिलीच घटना आहे.
अजगराच्या चारही पील्लांना एफ.डी.सी.एम च्या कक्ष क्रमांक 522 येथील नाल्या शेजारी सुरक्षीतपणे सोडण्यात आले.
या वेळी वनरक्षक सुभाष मरसकोल्हे संजीवन पर्यावरण संस्थेचे सदस्य उमेशसिंह झिरे,स्वप्निल आक्केवार, तन्मयसिंह झिरे,अंकुश वाणी,दिनेश खेवले,चेतन बोकडे, जय मोहुर्ले,रितेश पीजदुरकर,हर्षल वाकडे,अनुराग मोहुर्ले, रुपेश खोब्रागडे, अक्षय दुम्मावार आदि उपस्थीत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here