सोशल मीडियावर जाहिरात करने पडले माहगात : बिबट्याचे पिलू विकणे आहे.

0
134

वनविभागाला मिळालेल्या गुप्त माहितीवरून दिनांक 23 जुलाई 2021 शुक्रवार रोजी  वनविभाग कराड यांनी धाड टाकून ऋषीकेश शामराव इंगळे उर्फ लाल्या याला आज वसंतगड ता. कराड येथे अटक करण्यात आली.

ऋषीकेश शामराव इंगळे उर्फ लाल्या राहणार वसंतगड ता.कराड ह्याने सोशल मीडियावर बिबट्याचे पिलू विकणे आहे अशी जाहिरात केली.
त्यात पुढे त्याने ज्यांना हवे असेल त्यांनी व्हाट्सएपच्या फोन वर कॉल करा किंमत सांगू असे लिहिले.
सदर गोपीनिय माहिती मिळताच वनविभागाने तात्काळ हालचाल करून सदर आरोपीच्या सोशल मीडियावर असलेली  सर्व माहीत गोळा केली, तसेच इतर सूत्रांकडून त्याबद्दल माहिती काढली.सदर कारवाही साठी डी.बी. चे ऐ पी आय  किशोर धुमाळ यांनी मोलाची मदत करून आरोपीचे लोकेशन बद्दल माहिती दिली.
सदर सर्व माहितीच्या आधारावर सहायक वनसंरक्षक विलास काळे, मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे, वनरक्षक रमेश जाधवर, वनरक्षक खटावकर, वनरक्षक अशोक मलप, व चालक सकटे यांनी ऋषीकेश शामराव इंगळे उर्फ लाल्या यास वसंतगड येथे त्याच्या सध्या राहत असलेल्या घरातून ताब्यात घेतले.
त्याचे मोबाईल जप्त करण्यात आले आहे, त्याच्याकडे अधिक चौकशी करण्यात येत आहे.आरोपीस शनिवार दि.24 जुलाई 2021 सकाळी 11 वाजता कराड येथे कोर्टात हजर करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here