भारतीय अभिनेता व हास्य अभिनेता भरत गणेशपुरे यांचे ताडोबात आगमन

0
551

चंद्रपूर (मोहम्मद सुलेमान बेग): जग प्रसिद्ध ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये भारतीय अभिनेता व हास्य विनोदी अभिनेता भरत गणेशपुरे यांचे ताडोबात आगमन.

मराठी टेलिव्हिजन शो मध्ये त्याना कॉमिक परफॉर्मन्ससाठी ओळखला जातो. चल हवा येऊ द्या या मधील अभिनयाने भरत गणेशपुरे प्रसिद्धीस आले.


अभिनेता भरत गणेशपुरे आज दिनांक 21 नोव्हेंबर 2022 रोजी मोहर्ली प्रवेश द्वाराने  सकाळ फेरी जंगल सफारी केली असता त्यांना माया नामक वाघीण (T12) व एक नर वाघाचे दर्शन झाले व त्यासोबत इतर वन्यजीव देखील त्यांनी बघितले. ताडोबा मध्ये व्याघ्र दर्शन हमखास  होतो हे त्यांनी देखील मान्य केले. वनसमाचारचे प्रतिनिधी सोबत आपल्या मुलाखती मध्ये ताडोबात हमखास वाघ दिसतो व पर्यटकांनी ताडोबा मध्ये व्याघ्र दर्शनाकरिता एक तरी वेळा यावे जेणेकरून त्यांना वाघाचे दर्शन होईल व निसर्गाचा आनंद घेता येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here