अज्ञात वाहनाच्या धडकेत मादी बिबट्याच्या मृत्यू

0
149

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वन्यप्राण्यांचा वावर होत असल्याचे आपण नेहमीच बघतो व बरेच अपघात रस्ता ओलांडतांना होत असतात त्यातच चंद्रपूर मार्गावरील भिवकुंड येथील निर्मल धाबाजवळील नाल्याजवळ दि. 20 नोव्हेंबर 2022 रविवार रोज रात्रीच्या सुमारास एका अज्ञात वाहनाच्या धडकेत मादी बिबट्याचा जागेच मृत्यू झाला. मृतक बिबट्याचे वय 3 ते 4 वर्ष आहे .

सदर घटनेची माहिती बल्लारपूर वनपरिक्षेत्र अधिकारी नरेश भोवरे यांना दिली. माहिती मिळतात अधिनिस्त कर्मचाऱ्यासोबत घटनास्थळी दाखल झाले व मृतक बिबट्याचा मौका पंचनामा करून शव ताब्यात घेण्यात आले व वन्यजीव उपचार केंद्र, ताडोबा अंधेरी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर येथे पाठविण्यात आले व शवविच्छेदन करण्यात आले.
पुढील तपास मध्यचांदा वनविभागाचे उपवनसंरक्षक श्वेता बोड्डू, सहाय्यक वनसंरक्षक श्रीकांत पवार यांच्या मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी नरेश भोवरे करत आहे.
सदर घटनेच्या वेळेस वनरक्षक वर्षा पिपरे, एस. एम. बोकडे, टी. ओ. कमाले व ए. एम. चहांदे आदि उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here