गंगासागर (हेटी) येथे बिबट्याचा आठवडाभरापासून धुमाकूळ

0
332

जिल्हा प्रतिनिधी (यश कायरकर) :
तळोधी बाळापुर वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या गंगासागर (हेटी) येथील एकाच दिवशी वेगवेगळ्या घरच्या तीन शेळ्या व पाच कोंबड्या मारल्या. यात आनंदराव नान्हे यांच्या दोन गाभण शेळ्या तर चक्रधर गायकवाड यांची एक शेळी ठार केली. तर इतर लोकांच्या कोंबड्यांची कत्तल केली.
गेल्या आठवड्यापासून गावात घुसून रात्रभर रस्त्यावर फिरत कुणाच्या गोठ्यात तरथ कुणाच्या घरात घुसून रोज एक दोन शेळ्यांवर व कोंबड्यांवर ताव मारीत आहे. या बिबट्याने सलग दोन-चार दिवस गावातील विविध ठिकाणी रोज कुणाच्या न कुणाचे गोठ्यात शेळ्या व कोंबड्या ठार करीत गावात दहशत व भीतीचे वातावरण निर्माण केले आहे.
आज आज रात्रौ सुध्दा उध्दव नैताम यांची शेळी व कोंबड्या ठार केल्या.
“सध्या शेतीचा हंगाम सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांना रात्री अप रात्री उठून कामे करावी लागतात त्यामुळे तात्काळ या बिबट्याचा बंदोबस्त करावा.” अशी मागणी गंगासागर हेटीचे सरपंच दिलीपराव गायकवाड यांनी केली आहे.
तर वन विभागाने या बिबट्याच्या बंदोबस्त करण्याकरता गावाशेजारी पिंजरा लावल्याचे माहिती वनरक्षक राजेंद्र भरणे यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here