
 चंद्रपूर :
भारतीय हवामान खात्याने 25 जुलै 2025 रोजी चंद्रपूर जिल्ह्यासाठी “रेड अलर्ट” जाहीर केला असून, काही ठिकाणी अत्यंत मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे संभाव्य आपत्कालीन परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शैक्षणिक संस्था एक दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या संदर्भात, डॉ. नितिन व्यवहारे, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, चंद्रपूर यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील कलम 30(2)(5) व (18) नुसार दिलेल्या अधिकाराचा वापर करत खालील सर्व शैक्षणिक संस्थांना दिनांक 25/07/2025 रोजी सुट्टी जाहीर केली आहे:
अंगणवाड्या
पूर्व प्राथमिक शाळा
प्राथमिक व माध्यमिक शाळा
विद्यालये
महाविद्यालये
खाजगी कोचिंग क्लासेस
सदर आदेशाची अंमलबजावणी तात्काळ करण्यात यावी, अशा सूचनाही आदेशात देण्यात आल्या आहेत.
 जिल्हाधिकाऱ्यांनी नागरीकांना आवाहन केले आहे की, हवामान खात्याच्या अंदाजानुसार सतर्क राहावे, अनावश्यक प्रवास टाळावा आणि खबरदारीचे सर्व उपाय करावेत.
आपत्कालीन परिस्थितीत खालील आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा:
📞 जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर – 07172 250077


 
                