बिबट्याला जेरबंद वनविभागाला यश

0
326

चंद्रपूर : दि. 24 ऑगस्ट 2022 रोजी रात्री 8.00 वाजताच्या सुमारास बल्लारपूर तालुक्यातील विसापुर गावा लगत एका बिबट्या जेरबंद करण्यात आले.

विसापुर गावा जवळ असलेल्या महापारेषण परिसरात एक बिबट धुमाकुळ घालत असल्याने विसापुर येथील नागरीकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. महापारेषणच्या पडक्या इमारतीवर बिबट्याला बसून असल्याचे नागरीकांना दिसुन आले होते.
विसापुर येथील नागरीक व बल्हारशाह पेपर मिल येथील कामगारांनी बरेचदा रोड वर बिबट्याचे दर्शन झालेले आहे.

काही दिवसापूर्वी बल्लारपूर वनपरिक्षेत्रातील विसापूर गावाच्या हद्दीतील जुन्या पावर हाऊस जवळ बिबट्याचे दर्शन नागरिकांना झाले होते.  वनविभागाकडे नागरिकांनी बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी केली होती.
याची दखल घेऊन मध्यचांदा वनविभाग चंद्रपूरच्या उपवनसंरक्षक श्वेता बोड्डू यांनी शासनाकडे बिबट्याला जेरबंद करण्यास  दि. २३ ऑगस्ट २०२२ मंगळवार रोज परवानगी मागीतली होती.
परवानगी मिळताच त्यांनी सभा घेऊन बिबट जेरबंद करण्याचे निर्देश बल्लारपूर वनपरिक्षेत्र अधिकारी नरेश भोवरे यांना दिले.

सदर बिबट पेपर मील जुनी वसाहत, बल्हारपुर येथे सुध्दा धुमाकुळ घालत होता त्यामुळे परिसरात मानव व वन्यजीव संर्घष निर्माण होऊ नये व  अनुचीत घटना घडु नये म्हणुन बिबट्याला जेरबंद करण्याची परिसरातील नागरीकांची मागणी होती.

बिबट्याला जेरबंद करण्याची मोहिम  दि.२३ ऑगस्ट २०२२ पासुन राबविण्यात आली. त्यावेळेस ४ CCTV कॅमेरे, ४ ट्रॅप कॅमेरे व ३ पिंजरे लावण्यात आले.
CCTV कॅमेरामुळे बिबट्याच्या हालचालीवर निगराणी ठेवण्यात  आली होती. दि २४ ऑगस्ट २०२२ रोजी रात्री ८.०० वाजताच्या सुमारास बिबट जेरबंद झाल्याचे CCTV ने  निदर्शनास आले. जेरबंद केलेल्या बिबट्याला वन्यजीव उपचार केन्द्र, चंद्रपुर येथे पाठविण्यात आले आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील आधुनिक तंत्रज्ञाणाचा मदतीने वन्यप्राणीला जेरबंद करण्याची ही पहिलीच घटना आहे. ही मोहिम श्री. नरेश भोवरे  वनपरिक्षेत्र अधिकारी बल्हारशाह यांचे नेतृत्वात व मार्गदर्शनात के. एन. घुगलोत क्षेत्र सहाय्यक बल्हारशाह, ए.एस. पठाण क्षेत्र सहाय्यक उमरी, बि. टि. पुरी, क्षेत्रसहाय्यक कळमणा व वनरक्षक, आर.बि. बत्तलवार,एस.पि. कांबळे, ए.एम. चहांदे, टि.ओ. कामले आणी PRT टिम केम तुकुम, इटोली व कळमणा यांनी यशस्वी रित्या कामगीरी पार पाडली व तसेच विसापुर गावातील ग्रामस्थानी सुध्दा वन विभागाच्या टिमला सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here