तळोधी (बाळापूर) वनपरिक्षेत्रातील PRT सदस्य व वनरक्षक यांची कार्यशाळा संपन्न

0
401

चंद्रपूर  (मोहम्मद सुलेमान बेग);  तळोधी बाळापुर वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या संपूर्ण 13 बिटामधील PRT सदस्य, व वनपरिक्षेत्रातील संपूर्ण वनरक्षक कर्मचारी, वनमजूर यांची कार्यशाळा दि.24 ऑगस्ट 2022 रोजी तळोधी वनपरिक्षेत्रातील  सावरगाव येथील रोपवाटिका मध्ये दुपारच्या सुमारास घेण्यात आले.

सदर परिसरात होत असलेल्या मानव  व वन्यजीव संघर्ष या विषयाच्या अनुषंगाने व PRT सदस्य यांची कार्य, तसेच आपल्या परिसरात एकही मनुष्यहानी होऊ नये या संदर्भाने काय कार्य करता येईल?  काय उपाय योजना करता येतील ? या संदर्भाने ही कार्यशाळा घेण्यात आली.
यावेळेस प्रास्ताविक करताना आपल्या परिसरात शून्य मनुष्यहानी हा संकल्प ठेवून परिसरात कोणतेही मनुष्यहानी होणार नाही याकरिता कार्य करणे  PRT आणि वनरक्षक यांनी गस्त करणे,  या संदर्भाने याबाबतीत सहाय्यक उप वनसंरक्षक के.आर.धोंडने यांनी सूचना केल्या.  तर मुख्य मार्गदर्शक ‘स्वाब’ संस्थेचे अध्यक्ष यश कायरकर यांनी PRT चे गठन करण्यामागचे वनविभागाचे उद्दिष्ट,  PRT सदस्यांची कर्तव्य आणि त्यांनी करावयाची कार्य याबाबत सांगताना “तुम्ही वनविभाग व स्थानिक लोक यांच्या मधील दुवा असून वेळो वेळी कोणत्याही घटना होण्यापूर्वी लोकांना सावधान करणे, जंगलात वावरताना त्यांना सुरक्षा संदर्भाने वेगवेगळ्या सूचना देणे,  आणि गाव खेड्यात स्थानिक लोकांशी सतत संपर्कात राहणे, जेणेकरून मानव वन्यजीव संघर्ष कमी करता येईल आणि तो नक्कीच कमी होणार.” असे सांगितले. तर सोनाली कडनोर यांनी PRT सदस्यांशी चर्चा करताना “तुम्हाला आवश्यक ते सर्व साहित्य लवकरात लवकर पुरविण्यात येणार व तुम्ही आमच्या कर्मचाऱ्यांची सतत संपर्कात राहून मदत करायला हवे.” असे सांगितले. तर या कार्यक्रमाचा शेवट करताना उपस्थित मार्गदर्शक व PRT सदस्य यांचे आभार एस.एस.गौरकर वनरक्षक यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.
यावेळेस सहाय्यक उपवन संरक्षक के. आर. धोंडणे, वनपरिक्षेत्र अधिकारी सोनाली कडनोर, व स्वाब नेचर केअर संस्थेचे अध्यक्ष यश कायरकर यांनी या कार्यशाळेला मार्गदर्शन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here