मानव-वन्यजीव शिगेला पोहोचलेला संघर्ष : यात वाघाच्या समस्या की समस्येत सापडलेला वाघ..?

0
1248

सध्याच्या स्थितीत जंगल परिसरात व आजूबाजूला सुरू असलेल्या मानव-वन्यजीव संघर्ष संदर्भात बोलायचे झाले तर याला मुख्य कारण म्हणजे ‘वाघ’ हा एक फार मोठा गैरसमज समाजात पसरलेला आहे. मानव-वन्यजीव संघर्ष म्हणजे फक्त ‘वाघ आणि माणूस’ यांच्यातिलाच संघर्ष नाहीतर या जंगला लगत असलेल्या शेतकर्‍यांच्या शेती पिकांचे नुकसान करणारे रानगवे, हरीण, डुकरे, अस्वल यांच्यात आणि शेतकरी-शेतमजूर यांच्यात होणारे रोजनिशी चे संघर्ष. यात प्रामुख्याने ‘रानडुकरे’ हे शेतकऱ्यांसाठी नुकसानदायक असलेले जंगलातील मुख्य वन्य प्राणी आहेत. मात्र संघर्षमय स्थिती करीता नेहमीच वाघ या प्राण्याला मुख्यत्वे कारणीभूत ठरविले जाते.


लोकांनी जंगलात प्रवेश करायचा व वाघाने आपल्याच परिसर रक्षणार्थ किंवा चुकीने वाकुन असलेल्या महीला, किंवा पुरुषाला आपले शिकार समजून एखाद्याला मारले तर आरडाओरड केली जाते. लोकांना फक्त वाघ आणि मानव यांच्यामधील होत असलेल्या झटापटी च्या घटना जास्त लक्षात राहतात. ‘जेव्हा वाघाच्या हमल्यात एक व्यक्ती मारला जातो, त्याच सरासरी ने कुत्रा चावून शेकडो, मानसाच्या द्वारे हत्या करून हजारों, रस्ते अपघातात लाखो मानसं मारली जातात.’ मात्र वाघाच्या हमल्याच्या घटना जास्त चर्चेत येतात. जेव्हा-केव्हा एक मनुष्यहानी होते तेव्हा त्यात फक्त मानवाची नुकसान होत नाही तर वाघाची ही मोठी नुकसान यात होत असते. एक माणूस मारला गेल्यानंतर शेकडो वाघांना त्याचा जिम्मेदार धरून गदारोळ केला जातो. आणि यात प्रामुख्याने राजकीय पुढारी आपली व्होट बँक वाढविण्याकरता काही सामाजिक कार्यकर्ते लोकांची आपुलकी मिळवण्याकरता तर काही पत्रकार आणि प्रसिध्दी माध्यम आपली प्रसिद्धी करून घेण्याकरता फक्त वाघालाच जिम्मेदार समजून त्याच अनुषंगाने वाघाच्या बंदोबस्ताची किंवा त्याला ठार मारण्याची मागणी करत रस्त्यावर येतात. आणि यातूनच जगासमोर दिसून येतो वाघ आणि वाघाचा एक कुरूप चेहरा. आणि ‘वाघ व मानव’ या संघर्षाचा प्रवास सुरू होतो.
मात्र स्वतःला समझदार माननारा मानवप्राणी जमिनीवर आपला हक्क दाखवण्याकरिता एका वाघीनीची (अवनी) ची , पैशासाठी तळोधी वनपरिक्षेत्रातील वाघाच्या शिकारी ची घटना, अंधश्रद्धेपोटी सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील घटना ,तर कधी संरक्षणाच्या नावाखाली इलेक्ट्रिक करंट लावून ‘श्रीनिवास’ सारख्या वाघाची शिकार करतो. किंवा वाघाला वन विभाग मार्फत पोंभुर्णा येथे जोरबंद करताना हातबाँब फेकून गंभीर जखमी करतात तेव्हा कोणीही वाघाच्या बाजूने शिकार्यांना अटक करून त्यांना फाशी देण्याकरता किंवा संपुर्ण शिकार्यांचा, किंवा मानवजातीचा बंदोबस्त करण्याकरता रस्त्यावर येत नाही. या वर्षभरात आपल्या जिल्ह्यात करोडो पैकी ३९ लोक वाघाच्या हल्यात तर मानवाच्या हातून शेकडो पैकी १४ वाघ ही मारले गेलेले आहेत. यामुळे या विषयावर याच सुशिक्षित समाजाचे मार्गदर्शन करन्याची आवश्यकता आहे.
वाघांची संख्या वाढली असे बोलले जात असलो तरी मात्र वास्तविक परिस्थिती ही विपरीतच आहे. कधीकाळी एकोणिसाव्या शतकामध्ये एक लक्ष संख्या असलेले वाघ विसाव्या शतकाच्या सुरुवातीस चाळीस हजार (४०,०००) तर १९७२ या वर्षी देशात फक्त अठरासे(१८००) वाघ वाचलेले होते. त्यानंतर तात्कालीन प्रधानमंत्री श्रीमती इंदिरा गांधी यांनी या गोष्टीचे गांभीर्य ओळखून १९७२ ला वाघ्र प्रकल्प योजना सूत्रबद्ध केली १९७३ ला वाघ्र प्रकल्पाची स्थापना केली व त्यानंतर झालेल्या गणनेत १९९९ ला देशात चार हजार चारशे अठरा (४४१८) वाघांची नोंद करण्यात आली. नंतर २०१० ला अकरासे चाळीस (११४०) व २०१८ च्या गणनेत दोन हजार नउसे एकोनसत्तर (२९६९) वाघांची नोंद करण्यात आली. यात आकडेवारी सुधारली असली तरी वाठली असे म्हणने योग्य नाही. मात्र मानव वन्यजीव संघर्ष वाढत चालले आहे. कारण वाघाचे अधिवास कमी कमी होत नष्ट होण्याच्या मार्गावर होत आलेले आहे. कधी काळी पस्तीस ते चाळीस(३५-४००००) हजार चौरस किलोमीटर असलेले वनक्षेत्र आता मात्र एक टक्केच शिल्लक राहिलेले आहे.
मानव-वन्यजीव संघर्ष याकरिता महत्त्वाची कारणे म्हणजे लोकांनी जंगलात केलेले अतिक्रमण शेती उठवणे, कारखान्यासाठी रस्ते बांधकाम, वन उपज गोळा करण्यासाठी, लाकडे चोरीच्या उद्देशाने जंगलात प्रवेश, गुरेढोरे चारण्यासाठी जंगलात प्रवेश, त्यातही तृणभक्षी प्राण्यांची खाण्याकरिता अंदाधुंद होणारी शिकार, अभयारण्यातून रात्र आणि दिवसाचे पर्यटन, यामुळे आपला अधिवास सोडून वाघ सारखा निशाचर, लाजरा, वन्यप्राणी गावाच्या दिशेने, शेतीच्या दिशेने नवीन अधिवासाच्या शोधात यायला लागला. आणि यामुळे मानव-वन्यजीव संघर्ष वाढत जाऊन आता शिगेला पोहोचलेला आहे. यामुळे फक्त वन विभागाच किंवा वन्यजीव प्रेमी च नाही, तर संपूर्ण लोकप्रतिनिधी, जनतेने जागृत होऊन वाघ संरक्षणच नाहीतर मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी प्रयत्न करून गांभीर्याने याकडे लक्ष देणे महत्त्वाचे झालेले आहे.

✍️ यश कायरकर

  • अध्यक्ष
  • स्वाब नेचर केअर फाऊंडेशन’
  • ( ९८८१८२३०८३)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here