अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट ठार

0
421

कराड :

कराड तालुक्यातील वाठार जवळ असलेल्या फल्य ओव्हर राष्ट्रीय महामार्ग चार रोडच्या सुरवातीला बिबट्या जखमी अवस्थेत आज दि.26 दिसंबर 2021 रोजी सकाळी 5.30 वाजता च्या सुमारास वनक्षेत्रपाल बामणोली बाळकृष्ण हसबनिस यांना त्यांच्या सहकारी यांनी फ़ोन द्वारे निरोप दिला. निरोप मिळताच वनक्षेत्रपाल हसबनिस यांनी तात्काळ कराड वन क्षेत्रपाल तुषार नवले व मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे व वन विभागाची चमु घटना स्थळी पोहचुन पाहणी केली असता बिबट्या मृत अवस्थेत रस्त्यावर पडलेला दिसला. मृत बिबट्याचा मौका पंचनामा करून पशुसंवर्धन अधिकारी डॉ बोर्डे व त्यांच्या सहकाऱ्यांनी यांनी कराड पशुसंवर्धन दवाखान्यात शवविच्छेदन केले.

मृत बिबट हा पूर्ण वाढ झालेला नर असून त्याचे वय अंदाजे 4.5 ते 5 वर्ष आहे साधारण त्याचे वजन 45 किलो आहे.
मृत बिबट्याच्या डाव्या बाजूच्या शरीरावरील कंबरेवर जोरात एका अज्ञात वाहनाने धडक बसल्याने मोठ्या प्रमाणावर अंर्तगत रक्तस्त्राव झाले असल्याचे शवविच्छेदन मध्ये स्पष्ट झाले. बिबट्याचे सर्व अवयव, मिश्या, सर्व नखे , सर्व दात हे सुस्थितीत होते.

यावेळेस सहायक वनसंरक्षक महेश झंझुरणे, वनक्षेत्रपाल तुषार नवले , मानद वन्यजीव रोहन भाटे, वनपाल सावखंडे, वनपाल बाबुराव कदम, वनरक्षक अरुण सोळंकी, रमेश जाधवर, अश्विन पाटील, आदी वनकर्मचारी यांच्या उपस्थितीत बिबट्याचे दहन करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here