दिपाली आत्महत्या प्रकरणी अधिकारी निलंबित

0
517

अप्पर प्रधान मुख्य संरक्षक श्रीनिवास रेड्डी यांना सहआरोपी करणार

अमरावती जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येचे पडसाद राज्यभर उमटले आहेत. प्रारंभी दीपालीच्या कुटुंबातील सदस्य व बेलदार समाज संघटना यांचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी नकार दिला. शवविच्छेदन गृहासमोर दिवसभर धरणे आंदोलन केले. त्यांनतर पोलिसांनी सहआरोपी म्हणून अप्पर प्रधान मुख्य संरक्षक श्रीनिवास रेड्डी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे पोष्टमार्टेम सुरू झाले. त्यानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले. दिपालीच्या पार्थिवावर मोरगाव ता. नांदगाव जि. अमरावती येथे अंत्यसंस्कार होणार असून, पार्थिव गावी रवाना करण्यात आले.

दरम्यान, आत्महत्येप्रकरणी उपवनसंरक्षक शिवकुमार यांना अमरावती पोलीसांनी आज नागपुरातून अटक केली. दक्षिणेतील कर्नाटक या त्यांच्या मूळगावी पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या शिवकुमार यांना नागपूर रेल्वे स्थानकावरून पोलिसांनी ताब्यात घेतले. आज सायंकाळी त्यांना सेवेतून निलंबित करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here