दोन अजगर सापांना दिले सर्पमित्रानी जीवदान

0
531

तळोधी बा.;  तळोदी बाळापुर वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या सावरगाव येथील बोथली च्या तलावात मच्छीमारांनी लावलेल्या जाळात अडकवून असलेल्या दोन सहा – सहा फूट लांबीचे अजगर सापांना पकडून आज सुरक्षित ठिकाणी सोडून जीवदान देण्यात आले.

सावरगाव येथील भोसरीच्या तलावात साप अडकून असल्याची माहिती मिळतात सर्पमित्र घुश्मेश्वर बोरकर व विकास बोरकर यांनी दोन्ही प्रत्येकी सहा फूट लांबीचे अजगर सापांना मच्छीमारांच्या  जाळ्यातून  सोडवून आणले. त्यानंतर  वन विभागाला याची  माहिती देण्यात आली व  त्यांना जंगलात सुरक्षित ठिकाणी सोडण्यात आले. यावेळेस सर्पमित्र घृष्णेश्वर बोरकर,  स्वाब चे अध्यक्ष व सर्पमित्र यश कायरकर, स्वाबचे सदस्य विकास बोरकर, वेदप्रकाश मेश्राम, आलेवाही पि.आर.टी. सदस्य सचिन रामटेके, सिद्धार्थ गायधने, तळोधी बा. चे वनरक्षक एस. बी. पेंदाम आदि उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here