पद्मापूर गेट ते शेगाव (बु) मार्गावर शंभर मीटरच्या अंतरावर बांधले जात आहेत गतिरोधक

0
174

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प क्षेत्रात असणाऱ्या वन्यप्राण्यांच्या गति मुळे होत असलेल्या अपघात टाळण्यासाठी पद्मापूर गेट पासून मोहर्ली, मुधोली शेगाव (बु) या राज्य मार्गावरील 70 किमी अंतरावर शंभर शंभर मीटरच्या अंतरावर गतिरोधक बांधण्याचे काम दिनांक 24 मे 2021 पासून सुरू करण्यात आले.
परंतु या गतिरोधक लावण्या मागे वन विभागाच्या उद्देश फक्त वन्यजीवचा बचाव करने आहे. वन समचार
चे प्रतिनिधि काही ग्रामस्था सोबत चर्चा केल्यास ते म्हणाले की क्षमते पेक्षा जास्त गतिरोधक लावण्यात आल्यामुळे स्थानिक ग्रामस्थाचे अपधात होत आहे गतिरोधक लावण्यात आल्यानंतर आतापर्यंत 7 अपघात या परिसरात झाल्याचे दिसून येत आहे.

तसेच चंदनखेडा व मुधोली मध्ये जे प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णांना जाना येण्यास फार त्रास होणार आहेत या आरोग्य केंद्रातील प्रसूती कलावधीत भरती होणाऱ्या महिला रुग्णांना व तसेच इतर रुग्णांना चंद्रपूर च्या सामान्य रुग्णालयात रेफर करण्यात येते.
तसेच गरोदर महिलांना आधीच वेदनांनी त्रासलेल्या असताना जर रुग्णांना जर मुधोली ,मोहर्ली पद्मापुर या मार्गाने प्रवास करायचा झाला तर त्या रुग्णांना होणाऱ्या वेदना भर घालण्याचे काम मात्र या मार्गावर देण्यात असलेल्या शंभर-शंभर मीटरचा अंतरावरील गतिरोधक करणार आहेत.
पाच वर्षांपूर्वी याच मार्गावर तसेच गतिरोधक लावण्यात आले होते त्यावेळेस पण असेच अपघताचे प्रमाण वाढले होते त्यामुळे परिसरातील जनतेच्या मागणी नंतर हे गतिरोधक काढून टाकण्यात आले होते.
काही परिसरात गतिरोधक नसल्यामुळे अनियंत्रित वेगात वाहने चालविल्या जातात परिणामी अनेक वन्यजीवांचा नाहक बळी जातो. या आधी सुद्धा असे अनेक प्रकार मोहर्ली पद्मापूर दरम्यान झालेले आहे.त्यासाठी गतिरोधक शंभर शंभर मीटरच्या अंतरावर लावल्याने मानव वन्यजीव संघर्ष वाढेल, बाईक अपघात वाढेल. तसेच छोट्या चारचाकी वाहनांचा बंपर फुटण्याचे चान्स नाकारता येत नाही.
या मार्गावरील वाहनाच्या गति बाबत कडक नियमांचे अंमलबजावणी करणे जास्त गरजेचे आहे. तसेच गतिरोधक बांधकामाचा फेरविचार करण्यात यावे अशी मागणी त्या परिसरातील सरपंच व ग्रामस्थ करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here