उसाच्या सरी मध्ये बिबट

0
307

आज दि. 27 जुलाई .2021 मंगळवार रोजी सकाळी 8.30 च्या सुमारास साजुर  ता कराड येथील शेतकरी त्यांच्या गट क्रमांक 367 येथे असलेल्या शेतात वैरण काढण्यासाठी गेले असता त्यांना उसाच्या सरी मध्ये एक बिबट पडलेला दिसला.त्यांनी आवाज केला तरी तो काही पळाला नाही  , म्हणून त्यांनी तात्काळ पोलीस पाटील यांना कळविले .
तो पर्यंत बिबट्या असल्याची बातमी पसरली व आसपास च्या परीसरातील लोक जमा होऊ लागली.
बिबट्या हा सरी मध्ये आडवा एका कुशीवर पडलेला होता व त्याचा जोराने श्वास घेणे सुरू होते, इतर काही हालचाल करीत न होता.
वन्यजीव मित्र रोहित कुलकर्णी यांनी मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांना  कळविले. घटनेचे गांमभीर्य ओळखून सहायक वनसंरक्षक विलास काळे यांना रोहन भाटे यांनी घटनेची माहिती दिली व तात्काळ पिंजरा घेऊन घटनास्थळी दोघेही रवाना झाले.
घटनास्थळी पोहचे पर्यंत बिबट्याच्या मृत्यू झाला होता.
मृत बिबट्यास तात्काळ शवविच्छेदन करण्यासाठी कराड येथे पशुसंवर्धन हॉस्पिटल मध्ये पशुसंवर्धन अधिकारी डॉ बोर्डे, डॉ राहुल दडस यांनी शवविच्छेदन केले.
मृत बिबट हा साधारण 2 ते सव्वा दोन वर्षांचा नर होता.
त्याच्या पोटात शेळी खाल्याचे दिसून आले.
सदर बिबट्याचे सर्व भाग दात, मिश्या,कातडे,नख्या ह्या सुस्थितीत होते.
तो बोबट्या निमोनिया मुळे मृत झाल्याचे लक्षात आले.
त्याच्या दोन्ही फुफुस हे निमोनिया मूळे बाधित झाले असल्याचे निदर्शनास आले. सहायक वनसंरक्षक विलास काळे,मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे , वनक्षेत्रपाल अर्जुन गंबरे, वनपाल सवाखंडे ,वनरक्षक रमेश जाधवर, वनरक्षक सोळंखी,चालक सकटे, वन्यजीव मित्र रोहित कुलकर्णी यांच्या सर्वांच्या उपस्थितीत बिबट्याला वन विभागाच्या जागेत दहन करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here