अज्ञात ट्रकच्या धडकेत जखमी झालेल्या मादा बिबट्याचा वनकर्मचाऱ्यावर हल्ला

0
633

भंडारा : राष्ट्रीय महामार्ग 53 वर साकोली- लाखनी दरम्यान असलेल्या मोहघाटा महाराष्ट्र वन विकास महामंडळ रोप वाटिका जवळील घटना दि.२६ जुलै २०२२ रोजी संध्याकाळी ५.०० वाजताच्या सुमारास घडली असून एका अज्ञात ट्रकची धडक लागून बिबट जखमी झाले. रस्त्यावरून जाणाऱ्यांनी व्हिडिओ बनवायला सुरुवात केली.

सदर घटनेची माहिती वन विभागाला मिळताच साकोलीचे सहाय्यक वनरक्षक राठोड आणि लाखनी चे वनरक्षक कृष्णा सानप घटना स्थळी दाखल झाले व  जखमी अवस्थेत असलेला बिबट मादा असून त्यांनी कृष्णा सानप यांचेवर हल्ला केला व शेजारी असलेल्या जंगलात निघून गेली. शोध घेण्याचे काम वनविभाग करीत आहे पण सतत पाऊस पडत असल्याने आणि प्रकाश कमी झाल्याने शोधकार्यास अडथळा निर्माण झाले आहे. सदर हल्ल्यात जखमी कृष्णा सानप यांना पुढील उपचाराकरिता भंडारा जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
मोहघाटा परिसरातील जंगल हे नागझिरा व्याघ्र क्षेत्राचे वन्यजीव भ्रमंती मार्ग असून महामार्गावर वन्यजीवांना धोका होऊ नये याकरिता उपाययोजना करून मार्गाचे बांधकाम सुरू आहे. यावेळी उपवनसंरक्षक  राहुल गवई यांनी जखमी वनरक्षक यांना भेट देऊन त्यांशी स्थिती जाणून घेतली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here