गोरेवाडा येथे वाघिणीचा उपचारा दरम्यान मृत्यू

0
576

पोंभुर्णा येथील वाघिणीचा दिनांक 24 डिसेंबर 2021 रोजी गोरेवाडा बचाव केंद्रात आणलेल्या वाघिणीचा उपचारा दरम्यान काल दिनांक 26 डिसेंबर रविवार रोज रात्रीच्या सुमारास उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची घटना उघड़किस आली.

मिळालेल्या माहितीनुसार वाघिणीचा खालचा जबडा पूर्णपणे तुटल्याने या तरुण वाघिणीला 24 डिसेंबर शुक्रवारी सायंकाळी गंभीर अवस्थेत गोरेवाडा बचाव केंद्रात हलविण्यात आले होते. वाइल्ड लाइफ रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटर (WRTC) च्या पशुवैद्यकांनी सर्वोत्तम प्रयत्न करून ही, वाघिणीचा मृत्यु झाला.  वृत्तानुसार राज्यात यावर्षी 42 वाघाचा मृत्यू असून यात चंद्रपुर जिल्ह्यात 15 आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here